vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पत्रकारितेची तत्त्वे व मूल्ये जपण्याचा निर्धार व्हावा – रवींद्र मालुसरे

पत्रकारितेची तत्त्वे व मूल्ये जपण्याचा निर्धार व्हावा – रवींद्र मालुसरे

 

 

 

मुंबई : प्रतिनिधी पत्रकारिता हे प्रबोधनाचे व लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. सामाजिक घडामोडींचे स्वरुप प्रतिबिंबित करताना समाजाला आरसा दाखविण्याचे कार्यही पत्रकारिता करते. याच उद्देशाने समाजाला वैचारिकतेचा आरसा दाखविण्यासाठी मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे दैनिक सुरु करून रोवली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात गुलामगिरीतून देशाची मुक्तता करण्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतर काही वर्षे देशाचे प्रश्न मांडून विकासाची भाषा करण्यासाठी पत्रकारिता केली होती. मात्र अलीकडे काही वर्षांपासून आमची एकूणच पत्रकारिता ही सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्का पेक्षा राजकीय नेत्यांना मुजरे करण्यात अन अधिकाऱ्यांशी ‘गोड संबंध’ जोपासण्यात खर्च होतेय.

 

देशभरात पत्रकारिता तर्कहीन झाल्यामुळे आता संदर्भहीन होवून बसली आहे. सध्याच्या पत्रकारांवर चांगल्या संस्कारांचा आणि अभ्यासाचा अभाव असून चुकीचे संस्कार झाले आहेत. पत्रकारितेच्याही क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानामुळे बराच बदल झाले असले तरी गत पत्रकारितेचे गमावलेले स्थान पुन्हा प्राप्त करण्यासाठी जे कष्ट घ्यायला हवेत ते घेण्याचा प्रयत्न करताना कुणी दिसत नाही, पत्रकारिता करताना सेवा हा धर्म समजून समाजाच्या मूलभूत प्रश्नावर लेखणीतून प्रकाश टाकणारे आणि पत्रकारितेची तत्त्वे व मूल्य़े जपण्याचा निर्धार व्यक्त करणारे या क्षेत्रात अधिक व्हायला हवेत असे आवाहन मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी केले. पाक्षिक आदर्श रायगड वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त अंबरनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मालुसरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गुरुवर्य ह भ प उमेशमहाराज शेडगे, कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजप अंबरनाथ पूर्वचे शहर अध्यक्ष सर्जेराव माहूरकर, नगरसेवक सचिन पाटील, पोलादपूर नगरपंचायतीचे नगरसेवक शिवराज पार्टे, उद्योजक रामचंद्रशेठ कदम, वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख कृष्णा तथा के के कदम, नगरसेवक तुळशीराम चौधरी, प्रेरणा फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रेरणा गावकर-कुलकर्णी, मनसे कामगारसेनेचे राज पार्टे, पोलादपूर शिवसेना सहसंपर्क प्रमुख कृष्णा कदम, ह भ प जगदीशसिंग पप्पाजी आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पाक्षिक आदर्श रायगडचे कार्यकारी संपादक शैलेश सणस यांनी सुरुवातीला प्रास्ताविक करताना पाक्षिकाची वाटचाल आणि भूमिका याची मांडणी केली. तर मुख्य संपादक रमेश कों सणस यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

 

मालुसरे पुढे बोलताना असेही म्हणाले की, सध्याच्या गतिमान व आव्हानात्मक युगात सजग व डोळस पत्रकारिता अबाधित ठेवण्यासाठी पाक्षिक आदर्श रायगडने यापुढच्या काळात आपल्या कामाप्रती असणारी प्रतिबद्धता, उच्च दर्जाची पत्रकारिता करताना असणारी नैतिकता, सत्यासोबत उभी राहण्याची हिंमत, सचोटी -स्वातंत्र्य भूमिका घेणे महत्वाचे ठरणार आहे.

 

तर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यावेळी शुभेच्छा देताना म्हणाले की, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता. १५ ते २० वर्षापूर्वीची पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता पूर्णपणे बदलली असून आजच्या डिजिटल युगात ब्रेकिंग न्यूज क्षणात वाऱ्यासारखी पसरते. लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. बदलत्या काळात अनेक आव्हानांचा सामना करत आपल्याला पत्रकारिता करावी लागत आहे. अशा परिस्थितीत देखील आदर्श रायगडाने निष्पक्ष पत्रकारितेची परंपरा अबाधित ठेवावी. गुरुवर्य ह भ प उमेशमहाराज शेडगे यांनी सुरुवातीला सणस पिता-पुत्राचे कौतुक करीत उपक्रमाला आशीर्वाद दिला ज्येष्ठ भजनी गायक ह भ प रामचंद्रबुवा रिंगे, सुप्रसिद्ध पखवाज वादक सुनीलमहाराज मेस्त्री, ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ तिरपणकर, कवयत्री सुरेखा गावंडे, ज्येष्ठ लेखक रवींद्र माहिमकर, कामगार नेते राज पार्टे,कोतवाल गावचे उद्योजक तुकाराम शिंदे, दत्ता केसरकर, योगेश रिंगे, संजय होळकर, आम्ही रायगडकर संस्था आदींना राज्यस्तरीय विशेष पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. पत्रकार अविनाश म्हात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले

संबंधित पोस्ट

मुंबई उपनगरातील चेंबूरजवळ कारचा भीषण अपघात, धडक दिलेला डंपर चालक फरार

vishwatmaklokswamivarta

सन्माननीय कार्यकर्त्यांच्या उत्साही वातावरणात रामवाडी येथे पार पडली ‘संवाद बैठक’… ✌🏻🪷

vishwatmaklokswamivarta

निवडक टॉप क्लास शाळांमध्ये शिकण्यासाठी लागणारा शैक्षणिक खर्च मिळणार शासकीय योजनेतून…

नायर महाविद्यालय व रूग्णालयाच्या विस्तारीत इमारतीचे लोकार्पण सोयी – सुविधांच्या निर्मितीमधून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासनाचे काम- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त ३० जुलै रोजी परिसंवाद· संवेदनशीलता ते संकल्प : शोषणाविरोधात लढा

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्‍या प्रत्‍यक्ष निवडणूक कार्यक्रमाच्‍या अनुषंगाने महानगरपालिका अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस, उत्‍पादन शुल्‍क खात्‍याचे अधिकारी यांची संयुक्‍त बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta