
कॅन्सर रुग्णांसाठी संजीवनी ठरणार कॅन्सर पेशंटस एड असोसिएशन (सीपीऐऐचे ) पुनर्वसन केंद्र
सुरेश गायकवाड याच कडून
मुंबई प्रतिनिधी :
मुंबई- कॅन्सर रुग्णांचा स्वाभिमान आत्मविश्वास , मानसन्मान वाढावा त्यांचा आर्थिक विकास व्हावा . ते शारिरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम व्हावे . त्यांच्या जीवनाची आशा पल्लवित व्हावी . त्यांच्या सर्वांगीण विकासा सोबत त्यांच्या कुटुंबियांचा ते आधारवड व्हावे या उदात्त हेतूने कॅन्सर रुग्णांसाठी कॅन्सर पेशंटस एड असोसिएशन ( cpaa ) हे पुनर्वसन केंद्र त्यांच्यासाठी संजीवनी ठरते आहे असे या केंदाच्या कार्यकारी संचालिका मंजू गुप्ता यांनी आयोजित केलेल्या प्रेस क्लब येथील पत्रकार परिषदेत सांगितले . त्यावेळेस डॉ. सुमन अग्रवाल , संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अलका सप्रू , रूपा दलाल आदी मान्यवर उपस्थित होत्या .



