vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पादचारी पुलाच्या उभारणीनिमित्त वाहतुकीच्या मार्गात बदल..

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पादचारी पुलाच्या उभारणीनिमित्त वाहतुकीच्या मार्गात बदल..

 

 

जालना, प्रतिनिधी- जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील फुट ओव्हर ब्रिजची उभारणीनिमित्ताने अंबड चौफुली-मोतीबाग जाणारा रस्ता रविवार दि.20 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजेपासून ते 21 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 1 वाजेपर्यंतच्या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. तरी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 कलम 36 अन्वये राष्ट्रीय महामार्ग 753 वरील अंबड चौफुली-मोतीबाग ते छत्रपती संभाजीनगर चौफुली मार्गावरील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. असे आदेश पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी जारी केले आहेत.

 

पर्याय मार्ग म्हणून बीड-अंबडकडून येणारी वाहतुक व छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहतुक ही जालना येथील मंठा चौफुली-नाव्हा चौफुली-देऊळगाव राजा चौफुली- कन्हैयानगर-भोकरदन चौफुली बायपास मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाईल. सदरचे आदेश दि.20 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजेपासून ते 21 ऑक्टोबर 2024 रोजी 1 वाजेपर्यंतच्या कालावधीत पुलाची उभारणी पुर्ण होईपर्यंत लागू राहतील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

 

-*-*-*-*

संबंधित पोस्ट

जीडीसी अँड ए’ परीक्षा 23 ते 25 रोजी ; प्रवेशपत्रासाठी आवाहन

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न वाढीसाठी आधुनिक* तंत्रज्ञानाचा वापर करावा- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

vishwatmaklokswamivarta

पेडगाव येथील ३३ किलोवॅट ऊर्जा रोहित्राचे थाटात लोकार्पण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा शेतकऱ्यांनी तर प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचा कुटुंबीयांनी लाभ घ्यावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम  

26 सप्टेंबरला हयात प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयात शिबिराचे आयोजन 

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

vishwatmaklokswamivarta