vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अवयवदान ,देहदान जनजागृती विषयी पत्रकारांनी सत्याची कास धरावी – पुरुषोत्तम पवार

अवयवदान ,देहदान जनजागृती विषयी पत्रकारांनी सत्याची कास धरावी – पुरुषोत्तम पवार

(

मुंबई प्रतिनिधी सुरेश गायकवाड

मुंबई- पत्रकारांनी अंधश्रध्देला मुठमाती देऊन अवयवदान व देहदानाविषयी सत्याची कास धरावी .ज्यामुळे खऱ्या अर्थाने जनजागृती होऊ शकते असे ठाम मत संस्थेचे अध्यक्ष पुरुषोतम पवार यांनी व्यक्त केले. ते त्यांच्या दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने अवयवदान व देहदान जनजागृतीविषयी अभियान कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती . त्यावेळेस ते बोलत होते . यावेळेस मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण , उपाध्यक्षा स्वाती घोसाळकर , सचिव शैलेंद्र शिर्के , समन्वयक कुमार कदम , डॉ. सुजाता अष्टेकर आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळेस सुनील देशपांडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की अवयवदान , देहदान याविषयी सामाजिक जाणीव असलेल्या पत्रकारांची भूमिका महत्वाची असेल . कारण मृत्यूनंतरची दान प्रक्रिया मस्तिष्क मृत्यूची संकल्पना आणि त्याचे महत्त्व व त्यानंतर होणारे अवयवदान ,येणाऱ्या तांत्रिक , भावनिक अडी अडचणी या बाबी महत्त्वाच्या आहेत .जिवंतपणी होणारे अवयवदान आणि अवयव दात्यांचे कायदे आणि संरक्षण याविषयी विस्तृत माहिती दिली . यावेळेस डॉ.सुजाता अष्टेकर यांनी अवयवदान चळवळीशी संबंधित कायदे,शासकीय यंत्रणा व संलग्न असलेल्या संस्था याविषयी विस्तृत माहिती दिली.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकार संघाचे विश्वस्त अजय वैद्य ,प्रसाद मोकाशी यांच्यासह अन्य मान्यवर पत्रकार उपस्थित होते .

संबंधित पोस्ट

परिवहन विभाग:एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्त्वावरविकसित करणार : साठ वर्षाचा भाडेपट्टा करार

vishwatmaklokswamivarta

नंदूरबार जिल्ह्यातल्या देवगुई घाट परिसरात आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर ५३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरु केलं. जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

vishwatmaklokswamivarta

जालना शहरातील रस्ते आणि चौकप्रायोगिक तत्वावर विकसीत करणार-जिल्हाधिकारी आशिमा मित्तल-   

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यानिमित्त* *जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाकडून शिबीरांचे आयोजन*

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत अतिधोकादायक इमारत कोसळली; दुकानदार ढिगाऱ्याखाली अडकला, सुदैवाने बचावला

vishwatmaklokswamivarta

जालना गणेश महासंघातर्फे आयोजित अथर्वशीर्ष पठणास महिलांचा प्रतिसाद..

vishwatmaklokswamivarta