
ठाणे महानगरपालिका शाळा क्र. 73 विद्यार्थ्यांनी-रॅलीच्या माध्यमातून केली मतदानाची जनजागृती
ठाणे, प्रतिनिधी:- 159 कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात स्वीपच्या माध्यमातून ठामपा शाळा क्र. 73 मधील विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान रॅली काढून परिसरातील नागरिकांना मतदान करण्याचा संदेश दिला.
“मतदान हमारा अधिकार है, इससी अपनी सरकार बनती है..” अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी परिसरातून जनजागृती काढली. या रॅलीत शाळेतील शिक्षक देखील सहभागी झाली होते. यावेळी विद्यार्थ्यांना आपल्या घरातील पालकांना तसेच परिसरातील नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे असा संदेश देण्यात आला. या रॅलीस नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
00000



