
वागळे इस्टेट येथील के.बी.पी महाविद्यालयात मतदानाबाबत जनजागृती
ठाणे प्रतिनिधी:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वीपच्या माध्यमातून सर्व विधानसभा मतदारसंघात जनजागृती करण्यात येत आहे. गुरूवारी (24 नोव्हेंबर) 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील वागळे इस्टेट येथील के.बी.पी महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली.
लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येकाने बजावावा, आपले मत अमूल्य आहे, अशा प्रकारची जनजागृती करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली. तसेच संकल्पपत्राचे वाटप करण्यात आले. या विद्यार्थ्यांनी देखील 20 नोव्हेंबर रोजी आपण मतदान करणार आहे, तसेच मतदानासाठी घरातील पालक, आजूबाजूच्या परिसरातील नागरिक व मित्रपरिवाराला देखील मतदान करण्याबाबत आवाहन करणार असल्याचा विश्वास स्वीपच्या टीमला दिला. यावेळी महाविद्यालयातील एक विद्यार्थ्यांना मतदान जनजागृतीपर तयार केलेली कविता सादर केली.
00000



