भारत-चीन विवाद संपुष्टात ! दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर दोन्ही देशांमध्ये होणार मिठाईची देवाणघेवाण, लवकरच केली जाणार गस्त
राज्य प्रतिनिधी-
जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या भीषण चकमकीनंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेदरम्यान कराराच्या तपशीलांवर काम करण्यात आले. दोन्ही बाजूंमधील करारानंतर या भागात तैनात सैनिकांनी आपली उपकरणे हटवण्यास सुरुवात केली. याआधी बुधवारी चीनने सांगितले की, चीन आणि भारतीय सैन्याने पद्धतशीरपणे एलएसीवरील सैन्य मागे घेतले आहे. याचा शुभ मुहूर्त दिवाळीलाच असल्याने त्या निमित्ताने भारत चीन एक दुसऱ्यांना मिठाई वाटत करणार
सूत्रांकडून- दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर दोन्ही पक्ष सैनिकांना अधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्त मिठाई वाटप करणार आहे असल्याची यावेळी सांगण्यात आले भारत चीन दोन्ही देशातील अधिकाऱ्यांच्या झालेल्या चर्चेनंतर आपापले सैनिक माघार घेण्यास सुरुवात झाली आहे भारत चीन संयुक्तरीत्या परिसरात ग्रस्तही करणार आहेत नुकताच झालेल्या करारा अंतर्गत हे सर्व निर्णय घेण्यात आले
एलएसीवरील तणाव कमी होऊ लागला आहे. पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील दोन डेडलॉक पॉइंट्स- डेमचोक आणि डेपसांग येथे सैन्य मागे घेतले आहे
एलएसीवर गस्तीबाबत भारत आणि चीन यांच्यात झालेल्या करारावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 27 ऑक्टोबर रोजी सैन्य मागे घेणे ही पहिली पायरी असल्याचे सांगितले होते. पुढील पायरी म्हणजे तणाव कमी करणे. हा तणाव तेव्हाच कमी होईल जेव्हा भारताला खात्री होईल की चीनलाही तेच हवे आहे. तणाव कमी झाल्यानंतर सीमेचे व्यवस्थापन कसे करायचे यावर चर्चा केली जाईल. पूर्व लडाखमधील सीमावादावरून भारत आणि चीनमध्ये चार वर्षांपासून तणाव होता