मुंबई धारावीतील ज्येष्ठ नागरिकांसह, कुटुंबप्रमुखांची विजबिल वेळेवर देण्याची मागणी!
मुंबई प्रतिनिधी
मुंबई धारावीतील ज्येष्ठ नागरिकांसह, कुटुंबप्रमुखांची विजबिल वेळेवर देण्याची मागणी! एन दिवाळीच्या तोंडावर मुदतीपूर्वच बिल येत असल्याने विभागातील नागरिकांची मोठा नाह त्रास सहन करावा लागत आहे तसेच नागरिकांची तारांबळ उडत असल्याने विजेचे वेळेत देण्याची मागणी सध्या धारावी जोर पकडत आहे
प्राप्त माहितीनुसार ,ऐन दिवाळीत दिवाळीच्या वाढीव विजबिल तसेच ते बिल मुदतीच्या एक-दोन दिवस अगोदर येत असल्याने बेस्ट ग्राहकांची विशेषता जेष्ठ व कुटुंबप्रमुखांची तारांबळ उडते. त्यामुळे वेळेत बिल भरता येत नाही.घरगुती व कमर्शिअल वापरण्यात येणारी लाईट बिल पाच सहा दिवस अगोदर आल्यास आर्थिक तरतूद करून ती वेळ भरली जातील. पण मुळातच लाईट बिल वेळ येत नसल्यामुळे शेवटच्या दोन दिवसात बिल भरणे कठीण होते.धारावी संत कक्कय्या मार्गावरील एलटी नगर, शिवशक्ती नगर, नवी चाळ, कोकणी चाळ, ढीगला या परिसरातील लोकांनी एकत्र येऊन धारावीतील हॅपिनेस ज्येष्ठ नागरिक संघ व इतरही कुटुंबप्रमुखांनी सामुदायिक सह्यांचं तक्रार निवेदन ग्राहक सेवा अधिकारी बिल सेक्शन दादर वडाळा येथील बेस्ट कार्यालयात दि. २३नोव्हेंबर रोजी लेखी स्वरूपात सादर केले आहे.याची दखल प्रशासन बेस्ट विभाग बिल सेक्शन यांनी घ्यावी किंवा ग्राहकांसोबत संवाद चर्चा करण्याची संधी मिळावी असे निवेदनात म्हंटले आहे.हे निवेदन देण्यासाठी लहू हसनाळे,रंजीत खंदारे सुरेश सोनवणे, कचरू सदाफुले,गिरीराज शेरखाने,नंदकिशोर नारायणे, सूर्यकांत सोनवणे,विनोद जैस्वाल यांच्यासह हॅप्पीनेस ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रमुख दिलीप गाडेकर,महादेव सोनवणे, कैलास साबळे यांनी पुढाकार घेतला आहे.