vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

दिलखुलास’ कार्यक्रमात भंडारा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. संजय कोलते यांची मुलाखत

दिलखुलास’ कार्यक्रमात भंडारा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. संजय कोलते यांची  मुलाखत

 

राज्य प्रतिनिधी

राज्यात २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीच्या मतदानाची तर २३ नोव्हेंबर रोजी निवडणूक निकाल प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘भंडारा जिल्हा प्रशासनाची तयारी’ बाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. संजय कोलते यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत उद्या बुधवार दि. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी भंडारा शैलजा वाघ-दांदळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

विधानसभा निवडणूक-२०२४ शांततेत पार पडावी यासाठी राज्य निवडणूक आयोगामार्फत प्रत्येक जिल्हास्तरावर काटेकोरपणे नियोजन करण्यात आले आहे. आचारसंहितेच्या काळात नागरिकांनी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर कोणकोणत्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाच्या या प्रक्रियेत सहभाग घेवून मतदानाचा हक्क बजावावा यासाठीचे कोणते उपक्रम राबविण्यात येत आहेत. याविषयी माहिती डॉ. कोलते यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

संबंधित पोस्ट

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू; २५१ तालुके पूर्णतः तर ३१ तालुके अंशतः आपत्तीग्रस्त म्हणून घोषित शेती, घरे, जनावरे, मत्स्यव्यवसाय, पायाभूत सुविधा दुरुस्तीस मोठा दिलासा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta

टंचाई निवारणासाठी सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा- डॉ. नीलम गोऱ्हे मराठवाडा विभागातील टंचाई स्थिती व प्रशासनाच्या तयारीबाबत आढावा

मराठा आरक्षण: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘बामणी कावा’, हिंमत नसल्याने पोलिसांना पुढे करतात- मनोज जरांगे पाटील…

vishwatmaklokswamivarta

विभागीय महसुल क्रिडा स्पर्धांचे उत्साहात उद्घाटन· महसुल राज्य मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते महसुल क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

पाण्याची आवर्तने देताना कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

महिला लोकशाही दिनाचे 15 जानेवारीला आयोजन

vishwatmaklokswamivarta