vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मतदारांच्या सक्रीय सहभागाने मतदानाचा टक्का वाढणार -जिल्हाधिकारी सौरभ कटियार अमरावती येथे मतदान जनजागृतीसाठी तिरंगा महारॅली

मतदारांच्या सक्रीय सहभागाने मतदानाचा टक्का वाढणार -जिल्हाधिकारी सौरभ कटियार-अमरावती येथे मतदान जनजागृतीसाठी तिरंगा महारॅली…

 

राज्य प्रतिनिधी

अमरावती,  : स्वीप उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासन, महापालिका आणि विविध संस्था, संघटनांच्या मदतीने आज अमरावती येथे मतदार जनजागृतीसाठी तिरंगा महारॅली काढण्यात आली.नेहरू मैदान येथे झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आदी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. राजकमल, जयस्तंभ, इर्विन चौक मार्गे ही रॅली निघून विभागीय क्रीडा संकुलात समारोप करण्यात आला.

समारोपावेळी जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले, महारॅलीचे आयोजन उत्कृष्ट प्रकारे झाले आहे. यात सर्व नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली होती. मात्र, शहरी भागात मतदान कमी होत असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचून जागरूकता करणे गरजेचे आहे. त्यांच्यापर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहोचल्यास मतदानाच्या टक्केवारीत निश्चितच वाढ होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपले कर्तव्य समजून मतदान करावे, असे आवाहन केले.

संबंधित पोस्ट

मुंबईतील अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसएबिलिटीज च्या 42 व्या वार्षिक समारंभात शैक्षणिक आणि सांस्कृतिक उत्कृष्टतेचा उत्सव साजरा

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी..बिनचूक व पारदर्शी होण्यासाठी प्रयत्न करावे- विभागीय आयुक्त पी. वेलरासू

दलित आघाडीचे नेतृत्व मायावतींनी स्वीकारावे : रामदास आठवलेंचे सूचक विधान*

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील बांद्रा पूर्व येथे अरुणोदय वॉकर्स असोशियन तर्फे 28 वी वार्षिक चालण्याची स्पर्धा संपन्न..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत एक महत्त्वाचा तांत्रिक बदल करण्याचा निर्णय-महानगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी…

vishwatmaklokswamivarta

फुलांची उधळण करणाऱ्या जागतिक वारसा स्थळ कास पठरावर हेरिटेज वॉकच्या माध्यमातून मतदान जनजागृती..

vishwatmaklokswamivarta