vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मतदारांच्या जागरासाठी ‘त्यांचीही’ प्रभात फेरी

मतदारांच्या जागरासाठी ‘त्यांचीही’ प्रभात फेरी…

 

राज्य प्रतिनिधी नागपूर, “भारतीय राज्य घटनेने इतर नागरिकांप्रमाणेच आम्हालाही अमुल्य असा मतदानाचा अधिकार बहाल केला. आमच्या असंख्य तृतीय पंथीयांनी मागील लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करुन आमचे कर्तव्य पार पाडले. या विधानसभेच्या निवडणुकीतही आम्ही कर्तव्य नव्हे तर आत्मसन्मानाने मतदान करणार असून नागपुरकरांनीही मोठ्या प्रमाणात येत्या 20 तारखेला मतदानासाठी बाहेर पडावे,” असे आवाहन सोनू नयना या तृतीयपंथी मतदाराने केले. ‘जे मतदार मतदान करतील त्यांच्या परिवाराला आमचे आर्शिवाद पोहचतील’ अशी भावनिक सादही सोनूने घातली.

स्वीप अंतर्गत आज मतदारांच्या जनजागृतीसाठी व समाजातील प्रत्येक घटकाला मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराबाबत व सर्व मतदारांनी येत्या 20 तारखेला मतदान करावे या उद्देशाने तृतीय पंथीयांनी गितांजली चौक परिसरात रॅली काढण्यात आली होती. या रॅलीनंतर सोनू नयना यांनी ते भावनिक आवाहन केले. या जनजागृती अभियानाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.

गितांजली टॉकीज परिसरामध्ये आज सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीस झोनल अधिकारी सुरेश खरे, विद्या कांबळे, राखीबाई, मुस्कानबाई, विद्याबाई यांच्यासह अनेक तृतीयपंथीय उपस्थित होते. मतदानासाठी सर्व मिळून पुढाकार घेण्याची यावेळी उपस्थितांनी शपथ घेतली.

संबंधित पोस्ट

छत्रपती संभाजीनगर विभागात एक विद्यार्थी- एक वृक्ष उपक्रमपर्यावरण समृद्ध करण्यासाठी नियोजन, सहभाग नोंदविण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मणिपूरमध्ये हिंसाचार सुरुच, इंफाळमध्ये अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या

नागरिकांच्या सहभागातून आधारकार्ड सेंटर येथे-मतदान जनजागृती अभियान

vishwatmaklokswamivarta

मुस्लिम पुरुषांना तलाक देण्यापासून किंवा एकापेक्षा जास्त महिलांशी लग्न करण्यापासून न्यायालय रोखू शकत नाही’- केरळ उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

जालना येथे अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचे आवाहन