vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024- मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंदचे आदेश जारी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024- मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंदचे आदेश जारी

 

जालना, प्रतिनिधी :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 99-परतूर, 100-घनसावंगी, 101-जालना, 102-बदनापुर आणि 103-भोकरदन विधानसभा मतदारसंघासाठी बुधवार दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. तरी जालना दी मार्केट ॲण्ड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 मधील तरतुदीनूसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन बुधवार दि.20 नोव्हेंबर रोजी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवावेत, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

 आठवडी बाजार, जनावरांचे बाजार भरणाऱ्यामध्ये जालना शहरातील जवाहर बाग व मुर्गी तलाव परिसर, जालना तालुक्यातील नेर, परतूर तालुक्यातील दुधा, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव, भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ, हसनाबाद, तडेगाव, वाकडी-कुकडी , जाफ्राबाद तालुक्यातील कुंभारझरी, बदनापूर तालुक्यातील काजळा पानखेडा, सेलगांव, चिखली, देवपिंपळगाव, आणि अंबड तालुक्यातील चिंचखेड, रोहिलागड आणि ताडहादगावचा समावेश आहे. तरी या गावामध्ये भरविण्यात येणारे आठवडी बाजार बंद ठेवून या दिवशीचा बाजार अन्य दिवशी भरविण्यात यावा. असेही आदेशात नमुद आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्याच्या अनेक जिल्ह्यांत उन्हाचा तडाखा, विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यात पारा 40 अंशांच्या पुढे

vishwatmaklokswamivarta

विशेष लोकअदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

भारतीय रेल्वे लवकरच आपली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करणार

vishwatmaklokswamivarta

परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटांबना झाल्याबद्दल जाहिर निषेध..

vishwatmaklokswamivarta

खडकुत ते जांभरुन फाटापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक लगतच्या एकेरी मार्गाने …

रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटीच्या वतीने सुधागडात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन