vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

प्रवाशांच्या जिवितांचे रक्षण करणे हाच एकमेव उद्देश्य – दिपक कलिंगण ,नॅशनल जनरल सेक्रेटरी , जनराष्ट्रीय रेल्वे कर्मचारी युनियन 

प्रवाशांच्या जिवितांचे रक्षण करणे हाच एकमेव उद्देश्य – दिपक कलिंगण ,नॅशनल जनरल सेक्रेटरी , जनराष्ट्रीय रेल्वे कर्मचारी युनियन

 

( सुरेश गायकवाड ) मुंबई प्रतिनिधी

मुंबई- मुंबईकर आपला जीव मुठीत घेऊन रेल्वेने प्रवास करीत असतात .पण त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे प्रशासन घेत नाही . ही जबाबदारी रेल्वे प्रशासनाने घ्यावी म्हणून जनराष्ट्रीय रेल्वे कर्मचारी युनियनच्यावतीने सातत्याने पाठपुरावा सुरू आहे अशी माहिती या युनियनचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी दिपक कलिंगण यांनी दिली. त्यावेळी त्यांनी ही माहिती मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात बोलताना दिली . त्यावेळेस मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, सुधाकर कश्यप आदी पदाधिकारीसह अनेक मान्यवर उपस्थित होते .

  यावेळेस त्यांनी सांगितले की , रेल्वेचे जे प्रवाशी आहे ते कर्जत – कसारा , कल्याण , डोंबिवली , आदी लांबच्या पल्ल्यावरून प्रवास करीत असतात. त्यावेळेस एखादी र्दुघटना घडल्यास त्यांना युनियनच्यावतीने मदतीचा हात पुढे केला जातो , त्यांना तात्काळ औषधोपचार मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात . तसेच काही प्रवाशांना गावी जाण्यासाठी तिकिट काढण्यासंबंधी अडचणी निर्माण झाल्यास त्या सोडविण्यासाठी सहकार्य केले जाते.

 एवढेच नव्हे तर प्रवाशांना सुखसुविधा मिळाव्यात यासाठी रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जातो आहे .

संबंधित पोस्ट

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार

vishwatmaklokswamivarta

रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी महायुतीचा प्रचार करावा; नाराजगी सोडून उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत – गौतम सोनावणे….

vishwatmaklokswamivarta

रानभाज्यांना राजश्रय देऊन गडचिरोली ब्रँड निर्माण करण्याची गरज – कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात रानभाज्यांचे संवर्धन व विपणनावर भर

ठाणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेट्रो मार्गाची चाचणी संपन्न

vishwatmaklokswamivarta

मुंबईच्या साकीनाका पोलीस स्टेशनची इमारत धोकादायक आणि जर्जर अवस्थेत, महाराष्ट्र शासनाचे दुर्लक्ष सेना आमदाराचा आरोप

राज्यातील जनतेला सर्वाधिक ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देणारा हा #महसूलविभाग.