vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना विनम्र अभिवादन-हुतात्मादिन- २१नोव्हेंबर 

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना विनम्र अभिवादन हुतात्मादिन -२१ नोव्हेंबर

 

विशेष प्रतिनिधी लेख-

२१ नोव्हेंबर इ.स.१९५५ च्या तारखेची ती संध्याकाळ होती. सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने खवळून उठली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून त्याचा जळजळीत निषेध होत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगारांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता. दुपार टळल्यानंतर, म्हणजे मुंबईतल्या शंभर- सव्वाशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चा निघेल, असा अंदाज होता. पण त्याला छेद देत प्रचंड जनसमुदाय,एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत,फ्लोरा फाउंटनकडे जमू लागला. हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल, असा अंदाज होताच. कारण फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली होती. सर्व कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी पाठविले होते. जमावबंदीचा भंग करून, मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यानंतर थोड्या वेळातच विपरीत घडले. सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात आला. मात्र, तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे “दिसताक्षणी गोळ्या” घालण्याचे पोलिसांना आदेश होते. प्रेक्षणीय फ्लोरा फाउंटनाच्या कारंज्यातील पाण्यासारख्याच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यावर उडू लागल्या.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी, इ.स. १९५७ पर्यंत जे १०५ आंदोलक हुतात्मे झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती. या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली. त्यानंतर इ.स. १९६५ मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी झाली…!!!

मुंबई मिळाली पण बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी मधील मराठी भाषिक आज ही महाराष्ट्रात येण्यासाठी लढतायत हा संपूर्ण भाग महाराष्ट्रात विलीन झाल्यावरच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल।सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन- शुभम शेळके  महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी #सीमाभाग #बेळगाव महाराष्ट्राचे

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकेचा मालमत्ताकर विभाग ॲक्शन मोडवर – थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीस बजावणार !मालमत्ताकराचा भरणा तात्काळ करण्याचे महानगरपालिकेकडून आवाहन ; अन्यथा होणार कारवाई!

vishwatmaklokswamivarta

पोलिस पाटील भरतीसाठी आवाहन       

vishwatmaklokswamivarta

दहावीच्या शालांत परीक्षेत नवी मुंबई महानगरपालिका 23 माध्यमिक शाळांचा निकाल 94.72 टक्के**अंशिका यादव 95 टक्के गुण संपादन करीत नमुंमपा शाळांमध्ये सर्वप्रथम*

मुंबई गोवा महामार्गावर सुविधा केंद्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न..

vishwatmaklokswamivarta

🚩मुंबईतील शिव किल्ल्यावर*विजयादशमी दिनी गडपूजन साजरा.

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta