vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

कल्याण कार्यालयात संविधान दिन साजरा

कल्याण कार्यालयात संविधान दिन साजरा

 

बुलडाणा, प्रतिनिधी: सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात व कार्यालयाच्या अधिनस्त समाजकार्य महाविद्यालय, तसेच अनुसूचित मुलामुलींच्या शासकीय निवासी शाळा व मागासवर्गीय मुलामुलींचे शासकीय वसतिगृह येथे संविधान दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये संविधान प्रस्ताविकाचे वाचन करणे, संविधानाबाबत जनजागृती, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये इत्यांदी विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात आले होते.

जिल्हास्तरावरील संविधान दिन कार्यक्रम हा महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय येळगांव व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय बुलढाणा यांचे संयुक्त विद्यमाने समाजकार्य महाविद्यालय येळगांव येथे आयोजित करून साजरा करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी रॅली काढण्यात आली. कलापथकाच्या माध्यमातून संविधानाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी सर्व अधिकारी-कर्मचारी, नागरीक, महिला, विद्यार्थी यांचेसह एकत्रित संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.हरिश साखरे हे होते. तर नंदकुमार गायकवाड, सुरेश जाधव, संदिप कपले, रणजित सोळंके, गणेश कपले आदींची प्रमुख उपस्थिती होते.

या कार्यक्रमांचे प्रास्तविक सतिश बाहेकर यांनी केले. तर मुख्य मार्गदर्शक म्हणून संदिप कपले, नंदकुमार गायकवाड यांनी आपल्या व्याख्यानामध्ये संविधान दिनाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.अविनाश गेडाम यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय येळगांव व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय बुलढाणा येथील कर्मचाऱ्यांनी मोलाची भुमीका बजावली.

संबंधित पोस्ट

2024राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियानांतर्गतमोफत मोतिबिंदु शस्त्रक्रियेचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आरएनआय कडून ९९ हजार वृत्तपत्रांवर बंदी‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने व्यक्त केली तीव्र नाराजीस्थानिक पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न – संदीप काळे

उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण कालमर्यादा ठरवून करावे-जिल्हाधिकारी अशोक काकडे

स्टॉप डायरिया’ मोहीम प्रभावीपणे राबवा- अपर जिल्हाधिकारी अडकूणे

प्रस्थापितांची भीती मनातून काढून टाका ; शेतकऱ्याची अडवणूक होऊ देणार नाही : बोंधलापुरीत भाजपाच्या शाखा उदघाटनाला उत्स्फुर्द प्रतिसाद  

vishwatmaklokswamivarta

स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यास 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ…