vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रब्बी हंगाम पिक स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावाकृषी विभागाचे आवाहन 

रब्बी हंगाम पिक स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावाकृषी विभागाचे आवाहन

 

सातारा, प्रतिनिधी : कृषी विभागामार्फत रब्बी हगांम सन २०२४ -२५ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी रब्बी ज्वारी,गहु,हरभरा,करडई व जवस या पाच पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावे जमिन असणे आवश्यक असून तो स्वत: कसत असावा. या स्पर्धेत सहभागी शेतकऱ्याच्या स्वता:च्या शेतावर किमान ४० आर क्षेत्रावर लागवढ असणे आावश्यक आहे तसेच शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभागी होता येईल. शेतकऱ्यांनी विहीत नमुण्यातील अर्ज, ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२ व ८ अ चा उतारा, जात प्रमाणपत्र(आदिवासी असल्यास) बँक पासबुक व ७/१२ वर घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित नकाशा इत्यादी आवश्यक कागदपत्रे जोडून आपला अर्ज ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सादर करावा. पीक स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी सबंधीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी सपंर्क साधावा. 00000

संबंधित पोस्ट

मुंबईतील सायन रुग्णालयातून मनोरुग्णाची दुसऱ्या मजल्या वरून उडी, सुदैवाने वाचले प्राण.

vishwatmaklokswamivarta

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव तुडुंब भरून वाहू लागला पाणीपट्टीमध्ये वाढ

.सात-बारा उताऱ्यावरील नाव नोंदणी, फेरफार प्रक्रिया झाली गतिमान- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या नेतृत्त्‌वाखाली महसूल विभागाची विशेष मोहीम- अधिकार अभिलेखात नावनोंदणी होणार जलद- शेतकरी, सामान्य नागरिकांच्या पैसे व वेळेत बचत

vishwatmaklokswamivarta

कर्णपूरा यात्रेचा शांतता व सुरक्षित वातावरणात आनंद घ्यावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जेष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा   -सहायक आयुक्त समाधान इंगळे

विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानातूनयुवकांच्या जीवनाला सकारात्मक दिशा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानाचे उद्घाटन,- अमली पदार्थ प्रतिबंधविषयक होणार जनजागृती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची संकल्पना- 18 जुलैपर्यंत चालणार अभियान

vishwatmaklokswamivarta