vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

कराड येथील यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाला प्रशासनाचे सहकार्य राहील**- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी*

*कराड येथील यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाला प्रशासनाचे सहकार्य राहील**- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी*

 

सातारा, प्रतिनिधी :- कराड येथील शेती उत्पन्न बाजार समिती आवारात यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे शेतकऱ्यांना याचा लाभ होईल या दृष्टीने चांगल्या पद्धतीने आयोजन करावे. या प्रदर्शनाला प्रशासनाचे सहकार्य राहील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे या संबंधी जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकारी श्री. डुडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, उपविभागीय कृषी अधिकारी समिर पवार, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, संचालक नितीन ढापरे, राजेंद्र चव्हाण, विजयकुमार कदम आदी उपस्थित होते.कृषी प्रदर्शनामध्ये सेंद्रीय शेतीबाबत मोठ्या प्रमाणात जनजनगृती करावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, विविध कृषी उत्पादनावर आधारित विविध गावांमध्ये ठराविकच उत्पादन घेण्यात येणार आहेत. यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून. याबाबतही प्रदर्शनामध्ये जनजागृती करावी. प्रदर्शनामध्ये सेंद्रीय कृषी मालाचे जास्तीत जास्त स्टॉल उभे करुन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करावे, असेही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी यावेळी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

जन आरोग्य योजनेच्या लाभाबाबत नागरिकांना आवाहन..

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू आहे,दुर्घटनाग्रस्त विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यादी समोर आलेली आहे.

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन प्रश्‍न मार्गी लावू; ‘दादांचा वादा’प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्यवतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन..

vishwatmaklokswamivarta

पारशी टेकडी पोखरून गौनखनीज काढणाऱ्या  विरोधात दंडात्मक कारवाई करा- नंदा पवार

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे निर्जलीकरण प्रशिक्षण…

जिल्ह्यातील शेत पांदण रस्त्यांसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकारी आशिष येरेकर