vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पारशी टेकडी पोखरून गौनखनीज काढणाऱ्या  विरोधात दंडात्मक कारवाई करा- नंदा पवार

पारशी टेकडी पोखरून गौनखनीज काढणाऱ्या  विरोधात दंडात्मक कारवाई करा- नंदा पवार

 राज्य प्रतिनिधी -जालना-जालना शहरातील पारशी टेकडीचा डोंगर पोखरुन गौण खनिज काढून नेणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई करून पारशी टेकडीचे संवर्धन करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तथा जालना जिल्हा महिला काॅंग्रेसच्या जिल्हाधक्षा नंदा पवार यांनी केली आहे.पारशी टेकडी पोखरून गौनखनीज काढून नेण्यासंदर्भात नंदा पवार, सामाजिक कार्यकर्ते तथा काॅंग्रेसचे शहर जिल्हा सरचिटणीस गणेश चांदोडे,जया आठवले, राहुल रत्नपारखे आदींनी गुरूवारी ( दि. १७) जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.     या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जालना शहर हे बियाणांची पंढरी व स्टीलनगरी म्हणून ओळखले जाते,जालना शहराबाहेर असलेल्या समृद्धी महामार्गामुळे जालना शहराला महत्त्व प्राप्त झाले आहे. याच समृद्धी महामार्गाला लागून असलेली पारशी टेकडी ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे.या टेकडीवर जालना जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वात विविध सामाजिक संस्था संस्थांच्या माध्यमातून टेकडी संवर्धनाची कामे हाती घेण्यात आली आहेत. पर्यावरणाचा समतोल राखला जावा म्हणून पारसी टेकड़ी या डोंगरावर कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने जलसंवर्धनाचे कामे झालेली आहेत. तसेच 3.5 लाख वृक्षांची लागवड करण्यात आलेली असून त्यांचेसंवर्धन कार्य सुरु आहे. प्राण्यांसह विविध पशू पक्षी आणि जीवजंतूचा नैसर्गिकआधिवास तेथे आहे

  नैसर्गिक साधन संपत्ती असलेल्या या पारशी टेकडीचा काही भाग महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात आहे. मात्र औद्योगिक वसाहतीच्या फेस 3 च्या नावाखाली औद्योगिक विकास महामंडळाने जालना शहरातील उद्योजकांना या पारशी टेकड़ीवरील भूखंड विकून त्याचे वाटप केले आहे. आज तेथे उद्योग विकासीत करण्याचे काम सुरु आहे. भूखंड नावावर असलेल्या भूखंडधारकांनी पारश टेकड़ी परिसरात उत्खनन करून हजारो हायवा मुरूम  गौनखनीज) उकरून नेला आहे. यासाठी पारशी टेकडी येथील काही भागात जवळपास 150 ते 200 फूट उभा डोंगर कापण्यात आलेला असून तो धोकादायक झालेला आहे. डोंगराचा मुरूम काटून कापलेला भाग कधीही कोसळून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही भूखंडधारक डोंगरावर बांधकाम करण्यासाठी उत्खनन काम करत आहेत ते सुद्धा अतिशय धोकादायक ठरू शकते. याकडे जिल्हा प्रशासनाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.मुळात औद्योगिक विकास महामंडळास नैसर्गिक साधन संपत्ती असलेल्या भागाचे संवर्धन करणे आवश्यक असतांना त्यांनी चक्क डोंगराचा काही भाग उद्योग व्यवसायासाठी विकला आहे, ही बाब गंभीर व नियमबाह्य आहे. महसूल विभागाच्या पूर्व परवानीने गौनखनीज काढून नेणे हा गुन्हा असताना पारशी टेकडीवरील भूखंड धारक उद्योजक डोंगर पोखरून मोठ्या प्रमाणात गौनखनीज काढून नेत आहेत. यामुळे पारशी टेकडीचे मोठ्या प्रमाणात भूखलन होउन मोठी दुर्घटना होऊ शकते.

  आपण पारसी टेकडी आणि परिसरात होणारे उत्खनन तत्काळ थांबवावे. टेकडीवर कुठलेही बांधकाम होऊ नये यासाठीच्या कडक सुचनाऔद्योगिक विकास महामंडळासह संबधित विभागांना द्याव्या. आणि पारसी टेकडीचे संरक्षण करावे. डोंगराच्या परिसरात फक्त आणि फक्त झाडे लावावीत त्यांचे जतन व्हावे. डोंगराचे उत्खनन करण्यास पूर्णतः बंदी घालण्यात यावी.तसेच बेकायदेशीर गौनखनीज काढून नेणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई करावी ,अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

संबंधित पोस्ट

ख्रिश्चन धार्मिक गुरूंवर टीका करणाऱ्या आमदार पडळकर यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे निवेदन

देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्यात सोलर समूहाचे मोलाचे योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोबोटिक्स ॲण्ड युएव्ही फॅसिलिटी प्रकल्पाचे भूमिपूजन

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त विशेष उपक्रमांमधून नवी मुंबईकर नागरिकांमध्ये जनजागृती

शिक्षिकेची मरणोत्तर सामाजिक बांधिलकी- मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5 लाखांची देणगी

बांधकाम विषयक मानक कार्यप्रणालीचे उल्लंघन करणाऱ्या विकासकांकडून 1.40 कोटीहून अधिक दंडवसूली-नोटीशीची दखल न घेणाऱ्या विकासकांवर काम बंद करण्याबाबतची होणार कडक कारवाई

vishwatmaklokswamivarta

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करावे- मुख्यमंत्री आगामी शंभर दिवसात पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta