vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात एकाच दिवशी 100 शस्त्रक्रिया यशस्वी-जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजन

बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात एकाच दिवशी 100 शस्त्रक्रिया यशस्वी-जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजन

 

 

राज्य प्रतिनिधी ठाणे,- ‘माता आणि बाल’ यांचा सर्वांगीण आरोग्याचा हे सार्वजनिक आरोग्य विभागाचे केंद्रबिंदु असून या ध्येयाला स्मरून ठाणे जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या प्रेरणेतून विठ्ठल सायण्णा सामान्य रुग्णालय ठाणे येथे ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ अंतर्गत एकाच दिवशी शंभर लहानग्यांवर विविध शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या.

मानवी शरीर हे एका वृक्षासारखे असते. जसे त्याचे वय वाढत जाते, तसे ते थोडे कमकुवत होत जाते. अश्यात ते बाल्यअवस्थेत असतांनाच त्याची निगा राखणे आवश्यक आहे. हा विचार करून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत एकाच दिवशी शंभर मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यासाठी आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर आणि उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत ० ते १८ वयोगटातील मुला मुलींच्या हर्निया, डोळे, रक्ताची गाठ, चिकटलेली बोट, फायमोसिस, मान पोटाची गाठ अशा तब्बल 100 शस्त्रक्रिया एकाच दिवशी करण्यात आल्या. शस्त्रक्रिया एकाच दिवसात करायची असल्यामुळे दोन दिवस अगोदरच मुलांना घेऊन त्यांचे पालक सिव्हील रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे त्यांच्या खाण्या पिण्याची आणि राहण्याची संपूर्ण सोय रुग्णालयाने उत्तम केली होती. के ई एम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ.संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या शस्त्रक्रिया पार पडल्या.

यासाठी सायन रुग्णालयाच्या टीम ने विठ्ठल सायण्णा सामान्य रुग्णालयाच्या टीम बरोबर समन्वय साधून हे शिवधनुष्य पेलले. अति. जिल्हाशल्यचिकित्सक डॉ धीरज महंगाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी (ब.स) डॉ मृणाली राहूड, अधिसेविका श्रीम प्रतिभा बर्डे, विनोद जोशी, रोशन पाटील यांनी सर्व पालकांचे उत्तम मार्गदर्शन केले व संपूर्ण शिबिर सुरळीत पार पडेल याकडे जातीने लक्ष देऊन उत्तम नियोजन केकेले0000

संबंधित पोस्ट

पूरग्रस्त वसाहतीमधील बांधकामासाठी धोरण तयार करण्यासाठी समिती – मंत्री उदय सामंत

शालेय परिसरात मुलींवरील अत्याचाराला प्रतिबंधासाठी शासन व समाजाच्या सहभागाची आवश्यकता-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

कृत्रिम बुद्धिमतेच्या माध्यमातून मराठी भाषेत ज्ञान, सेवा व विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होणार – संतोष साळवी कृत्रिम बुद्धिमत्ता व मराठीतील वापरावर चर्चा

अधिकारी व कर्मचारी यांनी AI तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज – बाळासाहेब सोळंकी ,प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 :जिल्ह्यात शांततेत व सुव्यवस्थेत मतदानअंदाजित सरासरी 71.57 टक्के मतदान- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

साहित्य अकादमीचे बाल साहित्य व युवा साहित्य पुरस्कार २०२६ साठी आवाहन; पुस्तकांच्या नोंदणीला सुरुवात

vishwatmaklokswamivarta