vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई शहरात ‘ड्राय डे’ जाहीर

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई शहरात ‘ड्राय डे’ जाहीर…

 मुंबई प्रतिनिधी-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ६ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई शहर जिल्ह्यातील ठोक व किरकोळ देशीविदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्या एफ विभागाचे निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व अबकारी अनुज्ञप्त्या ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते दि. ६ डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस बंद राहणार आहेतअसे आदेश मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहे. आदेशाची अंमलबजावणी न केल्यास अनुज्ञप्तीधारकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या आदेशानुसारराज्य उत्पादन शुल्कचे  डी विभाग निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील एन.एम जोशी मार्ग व वरळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी सर्व अबकारी अनुज्ञप्त्याई विभाग निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील भोईवाडा व माटुंगा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व अबकारी अनुज्ञप्त्या ६ डिसेंबर २०२४ रोजी संपूर्ण दिवसभर बंद राहतील. संबंधित सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी या आदेशाची नोंद घ्यावी. जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावणी करण्यात कुचराई करतील त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ५४ व ५६ नुसार कडक कारवाई करण्यात येईलअसेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांच्या आदेशात नमूद आहे.

संबंधित पोस्ट

गुरु तेग बहादूर यांच्या हौतात्म्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानसभा निवडणूक २०२४नोडल अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणातून जिल्हाप्रशासनाची सज्जतासर्व विभागांचा समन्वय आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती गठीत

विशेष सहाय्य योजना लाभार्थ्यांना आधार अद्यावतीकरणाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यात आंतरजातीय विवाहितांना सामाजिक न्यायाचे बळ.

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !वारकरी महाअधिवेशनात निर्धार : तीर्थक्षेत्रे मद्य-मांसमुक्त व्हावीत; धर्मांतर थांबवण्यासाठी कठोर कायद्याची मागणी!

vishwatmaklokswamivarta