vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानव्यवसायस्थानिक बातम्या

रिसायकल विथ रिस्पेक्ट’ वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्राचे उद्घाटन

रिसायकल विथ रिस्पेक्ट’ वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्राचे उद्घाटन…

 

राज्य व्यावसायिक प्रतिनिधी-भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी मे. टाटा इंटरनॅशनल अँड टाटा मोटर्स कंपनीच्या सहकार्याने (“Re.Wi.Re) – ‘रिसायकल विथ रिस्पेक्ट’ या नावाच्या अत्याधुनिक सुविधा असलेल्या ‘वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्र’ (आरव्हीएसएफ) चे 30 नोव्हेंबर रोजी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याहस्ते पुण्यात उद्घाटन केले. याप्रसंगी टाटा इंटरनॅशनल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव सिंघल, टाटा इंटरनॅशनल व्हेईकल ॲप्लीकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव बत्रा, कार्यकारी संचालक गिरीश वाघ उपस्थित होते.

या नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्राची वर्षाला 25 हजार वाहनांची स्क्रॅपिंग क्षमता असणार आहे. यावेळी परिवहन आयुक्त श्री. भिमनवार म्हणाले की, टाटा इंटरनॅशनल व्हेईकल ॲप्लीकेशन्स सुरू करणे हा राज्यातील वाहन स्क्रॅपिंगचा व्यवसाय यशस्वी करण्याच्या प्रवासातील योगदानाचा आणखी एक मैलाचा दगड आहे. या सुविधा केंद्रात वाहनांच्या स्क्रॅपिंगची प्रक्रिया पर्यावरणपूरक व शासकीय नियमांचे पालन करणारी असेल. टाटा इंटरनॅशनल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सिंघल यांनी सुविधा केंद्रात सर्व प्रकारच्या प्रवासी व व्यावसायिक वाहनांचे स्क्रॅपिंग करण्यासाठी सुसज्ज असल्याचे सांगितले.

 तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बत्रा यांनी वाहन स्क्रॅपिंगच्या उद्योगातून टीआयव्हीए आणि टाटा मोटर्सने देशातील वाहनांचे जीवनचक्र बदलविण्याच्या दृष्टीकोनातून एक महत्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचे सांगत वाहनांच्या पुनर्वापराची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच फायदेशीर असल्याचे सांगितले.

संबंधित पोस्ट

Indian Railways: IRCTC ॲप आणि वेबसाइटवर रेल्वे तिकिटांचे बुकिंग बंद , पेमेंटबाबत तांत्रिक समस्या

Petrol Diesel Price: देशात सर्वात महाग पेट्रोल विकलं जातंय महाराष्ट्रात

महापुरुषांचा विचार ढणढनत ठेवायचा असेल तर चुल्हीत सतत विचारांची लाकडं घालावी लागतिल…आ सिद्धार्थ खरात

उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम-रविवारी 17 हजार 554 नवसाक्षरांची परीक्षा

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची प्रशिक्षण योजना

पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६’ स्पर्धा समन्वयाने यशस्वी करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार