vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आज प्रथमच बारामतीतील काही सहकाऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली – उपमुख्यमंत्री अजित पवार.

आज प्रथमच बारामतीतील काही सहकाऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली- अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य..

 

राज्य प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहिल्यांदाच बारामतीतील आपल्या सहकाऱ्यांना सहभागी होण्यासाठी स्वतः जातीने हजर होऊन सहकारी कुटुंबाची भेट घेतली आहे यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की

बारामतीतील माझ्या सहकाऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे हे मी माझे कर्तव्य समजतो. विधानसभा निवडणुकीनंतर आज प्रथमच बारामतीतील काही सहकाऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

यावेळी नगरसेवक बबलू देशमुख यांचे वडील अशोककाका देशमुख यांचे दुःखद निधन झाले. अशोककाकांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव रामचंद्र शिर्के यांचे दुःखद निधन झाले. शिर्के कुटुंबियांची भेट घेऊन सहसंवेदना व्यक्त केल्या आणि रामचंद्र शिर्के यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.

तसेच प्रकाश चव्हाण यांच्या पत्नी भाग्यश्रीताई चव्हाण यांचे दुःखद निधन झाले. चव्हाण कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व भाग्यश्रीताईंच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.

संबंधित पोस्ट

महाड क्रांतीभुमीत भिमसृष्टी उभारण्यात यावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*  *चवदार तळे सत्याग्रहाच्या 98 व्या वर्धापनदिनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना चवदार तळे येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले विनम्र अभिवादन* 

राज्याच्या मुख्य सचिवपदी शासनाने महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी ४९ वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला.

अनुसूचित जमातीचा सामुहिक विवाह सोहळा आयोजनासाठी स्वंयसेवी संस्थांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस, या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अलर्ट  

९.२२ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची परतफेड

आंतरजातीय विवाह केलेल्या १४० जोडप्यांना अनुदान वितरीत