vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

बुलढाणा येथे पाच दिवसीय पशुपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

बुलढाणा येथे पाच दिवसीय पशुपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

 

बुलढाणा, प्रतिनिधी: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रद्वारा जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योग, व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजागार युवक व युवतींसाठी बुलडाणा येथे शेळीपालन, कुक्कुटपालन, गाय, म्हेसपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दि १८ ते २२ डिसेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत होणार आहे.

या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश हा सुशिक्षित बेरोजगार यांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करावा हा आहे.

या प्रशिक्षणात शेळीपालन, कुक्कुट आणि गाय म्हेस पालनाचे तंत्र व प्रकार, त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन, रोग व लक्षणे, खाद्य निर्मिती व चाऱ्याचे प्रकार व उद्योग सुरु करण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाणार आहे. त्यासोबत उद्योजकता विकास, उद्योग संधी मार्गदर्शन, शासकीय योजनाची माहितीचे मार्गदर्शन या प्रशिक्षणात तज्ञ व्यक्ती करणार आहे.

 प्रशिक्षणात प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार हा किमान ५ वी पास, वय १८ ते ५० वर्षे असावे. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिल्या जाईल. प्रशिक्षणासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून त्यासाठी दि. १८ डिसेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत गणेश गुप्ता प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, तहसील कार्यालया जवळ, चिखली रोड, बुलडाणा यांच्याशी संपर्क साधावा. याशिवाय त्यांना ९०११५७८८५४ / ८२७५०९३२०१ या भ्रमणध्वनीवरही संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी किशोर अंभोरे यांनी केले आहे. 000000

संबंधित पोस्ट

गुंठेवारी मालमत्ताना पन्नास टक्के सुट व सवलत देऊन नियमित करून देण्यात यावी,औरंगाबाद शहर सुधार समितीच्या वतीने मनपा आयुक्त सचिवला निवेदन.

सेल्को फाउंडेशन’च्या सहकार्याने १८ जिल्ह्यांत,प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौर ऊर्जीकरणसौर ऊर्जेच्या वापरामुळे दर्जेदार आरोग्य सुविधांची उपलब्धता- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सकळ मराठा समाज आणि मराठा सामाजिक संघटनांच्या दट्ट्याने जायकवाडीत पाणी सोडणे भाग पडले ः डॉ. संजय लाखेपाटील

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव: राज्य महा उत्सव अंतर्गत स्पर्धा व पोर्टलला उदंड प्रतिसाद  सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांचे अधिक सहभागाचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

दररोज राष्ट्रगीत गायन उपक्रमातून कर्नाळमध्ये देशभक्तीची जोपासना- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

दुचाकी वाहनासाठी एमएच-11 डीटी मालिका सुरु**शासकीय फी भरुन आकर्षक क्रमांक आरक्षित करा*

vishwatmaklokswamivarta