vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गणेशोत्सव: राज्य महा उत्सव अंतर्गत स्पर्धा व पोर्टलला उदंड प्रतिसाद  सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांचे अधिक सहभागाचे आवाहन 

गणेशोत्सव: राज्य महा उत्सव अंतर्गत स्पर्धा व पोर्टलला उदंड प्रतिसाद  सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांचे अधिक सहभागाचे आवाहन

मुंबई, प्रतिनिधी : राज्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवास २०२५ पासून राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. या राज्य महाउत्सवांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चा या वर्षापासून तालुकास्तरापर्यंत विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा जिल्हा व राज्यस्तरांसोबतच तालुकास्तरीय पारितोषिके देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रभरातील ४०४ मंडळांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला असून स्पर्धेचे परीक्षण सहभागी तालुक्यांत सुरू आहे.

राज्योत्सवाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरलेले घरगुती व सार्वजनिक गणपती बाप्पांचे छायाचित्र अपलोड करण्यासाठी स्वतंत्र पोर्टल देखील लोकांसाठी व मंडळांसाठी विशेष आकर्षण ठरले आहेत. या पोर्टलद्वारे मोठ्या संख्येने भाविक आपल्या गणपती बाप्पांची छायाचित्रे सर्व गणेशभक्तांच्या दर्शनासाठी अपलोड करत आहेत. या पोर्टलद्वारे आजवर २०० हून अधिक जणांनी आपल्या घरच्या व ७० हून अधिक सार्वजनिक मंडळांनी फोटो अपलोड केले आहेत. घरोघरीच्या बाप्पांचे दर्शन व सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांचे दर्शन घरबसल्या घेणे यामुळे सर्व गणेशभक्तांना शक्य झाले आहे.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपती मंदिरे व प्रसिद्ध सार्वजनिक मंडळाच्या गणपतींचे थेट दर्शन जगभरातील गणेशभक्तांना एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे, याकरिता सुरू करण्यात आलेल्या पोर्टलला देखील गणेशभक्तांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. या पोर्टलमुळे प्रामुख्याने मुंबईचा लालबागचा राजा, मुंबईचा राजा, खेतवाडीचा गणराज, पुण्याचा दगडूशेठ हलवाई, प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरातील सिद्धिविनायकाचे दर्शन, अष्टविनायकांचे व टिटवाळ्याच्या गणपतीचे दर्शन एकाच क्लिकवर उपलब्ध झाले आहे. या दोन्ही पोर्टलमुळे जगभरातील गणेशभक्तांना घरबसल्या विविध जिल्ह्यातील व शहरातील गणपतींचे अतिशय सुलभ दर्शन होत आहे.

या उदंड प्रतिसादाबद्दल राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.शेलार यांनी भाविकांचे आभार मानत इतरांनीही ganeshotsav.pldmak.co.in या पोर्टलवर त्वरित छायाचित्रे पाठवून या राज्य महा उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

**

संबंधित पोस्ट

सांगली येथे विद्यार्थी विभागाचे ६५ वे राज्य कला प्रदर्शन – मंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा सक्रिय पाठिंबा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**रिपब्लिकन महिलांनी आंदोलनात अग्रेसर राहावे*

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात श्री. छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि सरंक्षण विशेष अध्यासन केंद्र ’ आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्राचे उदघाटन”मातृभाषेचा अभिमान बाळगतांना अन्य भाषांचा सन्मान करावा”- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत ई-केवायसी करु न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनस्तरावरुन देण्यात आलेले नाहीत. याबाबतचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही,असे महिला व बालविकास विभागातर्फे कळविण्यात आले

प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनाजिल्ह्याचा कृती आराखडा सर्वसमावेशक करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली मोटेवाडी दुर्घटनेतील रूग्णांची विचारपूस- मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 4 लाखांची मदत देणार- जखमींच्या उपचाराचा खर्चही शासन करणार