vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सैन्य दलातील अधिकारी-पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची संधी..

सैन्य दलातील अधिकारी-पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची संधी..

 

            जालना प्रतिनिधी:- भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्विस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची मोफत पुर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे महाराष्ट्र शासनाकडून एसएसबी कोर्स क्र. 60 आयोजित करण्यात येणार आहे. तरी जालना जिल्ह्यातील इच्छूक युवक-युवतींनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे गुरुवार दि. 26 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत मुलाखतीस हजर रहावे. संपुर्ण प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थ्यांना नि:शुल्क प्रशिक्षण, निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हॉट्सअप क्र. ९१५६०७३३०६ वर संपर्क करावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

नंदा मुंदे यांना सेंद्रिय शेतीतील जैविक इंडियन हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सदस्य अबू आजमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन्ही सभागृहात मागणी…

vishwatmaklokswamivarta

मुंबईत 6 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलीस सतर्क

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी माण तालुक्यातील विविध शाळांना दिल्या* *भेटी* 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४-२८८ विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती‘सी-व्हिजिल ॲप’वर आचारसंहिता भंगाच्या १०११ तक्रारी प्राप्त; यापैकी ९९५ निकाली…

vishwatmaklokswamivarta

दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी; ३७ लाख कोटींचे सामंजस्य करार, सुमारे ४३ लाख रोजगारनिर्मिती – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

vishwatmaklokswamivarta