vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बॉलीवुड साउथ चा अभिनेता सुपरस्टार पुष्पा अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर…

बॉलीवुड साउथ चा अभिनेता सुपरस्टार पुष्पा अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर…

 

[ राज्य प्रतिनिधी ]

साऊथ चा सुपरस्टार पुष्पा अल्लू अर्जुनला तेलंगणा उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अल्लू अर्जुनला सेशन कोर्टने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने आता त्याचा जामीन मंजूर केला आहे. हैद्राबादमधील संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमिअर शोवेळी चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हैद्राबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चित्रपटाचा प्रीमिअर शो आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अल्लू अर्जुनने पोलिस प्रशासनाना माहिती न देता उपस्थित लावली. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी झाली. अचानक झालेल्या गर्दीचे व्यवस्थापन त्या चित्रपट व्यवस्थापकांना करता आलं नाही. परिणामी त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. 4 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर त्या महिलेच्या कुटुंबीयांनी अल्लू अर्जुन आणि संध्या थिएरट मालकाच्या विरोधात गुन्हा नोंद केला.  तासाभरात जामीन मंजूर

अल्लू अर्जुनला हैद्राबाद चेंगराचेंगरी प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याने जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. तासाभरातच त्याला जामीन मंजूर करण्यात आला.

अल्लू अर्जुनवर आरोप काय?

पुष्पा 2 च्या प्रीमियरसाठी अल्लू अर्जुनने उपस्थितीबद्दल आगाऊ माहिती न दिल्याचा आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर संध्या थिएटरवर सुरक्षेबाबत निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर अल्लू अर्जुनने मृत महिला आणि तिच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत 25 लाख रुपयांची मदत केली. तसेच दुःख व्यक्त करणारा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला होता.

संबंधित पोस्ट

विधानपरिषद लक्षवेधी :शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी भरारी पथके- मंत्री धर्मराव बाबा आत्राम

vishwatmaklokswamivarta

थकीत लाभार्थींनी थकीत मुद्दल व व्याज रकमेचा एकरकमी भरणा करुन कर्ज खाते बंद करावे आणि कर्जमुक्त व्हावे

vishwatmaklokswamivarta

शिवसेना आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा प्रतिसाद..

झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील सात जिल्ह्यांमध्ये भारतीय रेल्वेच्या दोन बहुमार्गिका प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता; यामुळे रेल्वेचे जाळे सुमारे 318 किलोमीटरने वाढणार

सांगली येथे राष्ट्रवादी पार्टी चे नेते जयंत पाटील यांना इस्लामपूर न्यायालयाचे वारंट;

नॅशनल हेराल्ड प्रकरण,सोनिया गांधी यांची आज ईडीकडून चौकशी, काँग्रेस नेत्यांची देशव्यापी निदर्शने