vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब…

[

राज्य प्रतिनिधी नागपूर: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता खातेवाटपावरही अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये गृह, महसूल, सार्वजनिक बांधकाम खातं हे भाजप आपल्याकडेच ठेवणार आहे. तर अर्थ खातं हे अजित पवारांकडे जाणार आहे. गेल्या वेळी शिवसेनेकडे असलेले नगरविकास खाते यंदाही त्याच पक्षाकडे राहणार असून स्वतः एकनाथ शिंदे हे त्या खात्याचे मंत्री असतील अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

एकनाथ शिंदे हे गृह आणि नगरविकास खात्यासाठी आग्रही होते. पण गृहखाते त्यांना देण्यास भाजपने नकार दिला. त्यानंतर आता नगरविकास खातं आणि भाजपकडे असणारे गृहनिर्माण खातं हे शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती आहे. यापैकी नगरविकास खातं हे एकनाथ शिंदे यांच्याकडे असेल अशी माहितीही आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या मंत्रिमंडळात होती ती महत्त्वाची खाती त्या त्या पक्षाकडेच राहणार आहेत. तर शिंदेंना हवं असलेले गृहखातं हे भाजप स्वतःकडे ठेवणार आहे. देवेंद्र फडणवीस हे गृहखातं आपल्याकडेच ठेवणार असल्याची माहिती आहे. तर नगरविकास खातं हे शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेकडे असलेलं उत्पादन शुल्क खातं हे राष्ट्रवादीला जाणार असल्याची माहिती आहे. तर भाजपच्या वाट्याचं गृहनिर्माण खातं हे शिवसेनेला देण्यात येणार आहे. राष्ट्रवादीकडे अर्थ खातं जाणार असून ते अजितदादा स्वतःकडे ठेवणार आहेत. तसेच महिला व बालकल्याण खातं हे राष्ट्रवादीकडेच राहणार असून आदिती तटकरे या त्या खात्याच्या मंत्री असणार आहेत …

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राच्या सत्तेत अजित पवारांच्या एंट्रीनंतर शिंदे गट नाराज असल्याची चर्चा ? मंत्री दीपक केसरकर यांनी केला खुलासा…

महायुती सरकारच्या वतीनं आदिवासींकरिता शिक्षण, आरोग्य, रोजगार, पाणीप्रश्न, धरण या बाबींशी संबंधित प्रश्न आम्ही सोडवलेले आणि महत्त्वाचं म्हणजे पेसा भरतीवर आमचे लक्ष असल्याचे राष्ट्रवादी प्रमुख नेते अजित पवार सभेला संबोधित करताना म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा महायुतीचे नवापूर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री. भरत गावित यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते

vishwatmaklokswamivarta

हिंगोली येथे काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेड येथून जिल्ह्यातील हिवरा/चोरंबा फाटा येथे शुक्रवारी सायंकाळी दाखल झाली. आहे

vishwatmaklokswamivarta

मतदार यादीतील घोळांचे प्रदर्शन: नवी मुंबईत मनसेचा निवडणूक आयोगावर थेट प्रहार!

vishwatmaklokswamivarta

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या राष्ट्रवादी पार्टी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भावनिक आव्हान

vishwatmaklokswamivarta

मनसेनेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरें यांनी मंत्री भाजपा नेते आशिष शेलारांची यांची भेट घेऊन मागण्याचे निवेदन दिले