जालना शहर महानगरपालिकेमार्फत शहरात-एकल प्लास्टीक वापर बंदी (Single Use Plastic) बाबत कारवाई”यापुढे शहरात नियमितपणे कार्यवाही करण्यावर भर – सहायक आयुक्त…
जालना शहर महानगरपालिकेमार्फत शहरात-एकल प्लास्टीक वापर बंदी (Single Use Plastic) बाबत कारवाई”यापुढे शहरात नियमितपणे कार्यवाही करण्यावर भर – सहायक आयुक्त…
राज्य प्रतिनिधी- शहरात एकल प्लास्टीक (Single Use Plastic) साठाबाबत माहिती मिळाल्यानुसार जालना शहर महानगरपालिकेमार्फत आज दिनांक २३.१२.२०२४ रोजी दुकानदार/आस्थापना गायत्री प्लास्टीक, जालना यांच्याकडे प्लास्टीक आढळुन आल्याबाबत त्यांच्यावर १०,०००/- अक्षरी दहा हजार रुपये दंड व ६५० किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले. सदरच्या कार्यवाहीमध्ये जालना मनपाच्या सहायक आयुक्त श्रीमती सुप्रिया चव्हाण, स्वच्छता विभाग प्रमुख पंडीत पवार, स्वच्छता निरीक्षक श्री. अशोक लोंढे, श्री. शोएब खान व इतर कर्मचारी उपस्थित होते.
करिता जालना शहर महानगरपालिकेमार्फत शहरातील सर्व आस्थापना/दुकानदार व नागरिक यांना आवाहन करण्यात येते की, शासनाकडुन एकल प्लास्टीकचा (Single Use Plastic) वापर, वाहतुक, विक्री व साठाबाबत बंदी असुन एकल प्लास्टीकचा वापर, विक्री वाहतुक व साठा करु नये याबाबत सहकार्य करावी ही विनंती.
जालना शहर महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदुषण मंडळामार्फत याबाबत नियमितपणे तपासणी/पाहणी करण्यात आहे. प्लास्टीक वापरकर्त्यांवर दंडनीय कार्यवाही करुन गुन्हा नोंद करण्याबाबतची देखील कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच शहरात ज्याठिकाणी प्लास्टीक वाहतुक, विक्री, वापर व साठा होत असेल तर याबाबत जालना मनपास अवगत करुन सहकार्य करावे.