पर्यायी रस्त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होईल- आ.अर्जुनराव खोतकर
जालना प्रतिनिधी : शहरात होत असलेल्या पर्यायी रस्त्यामुळे वाहतूक कोंडीतून वाहनधाराकांची सुटका होणार असून विकासाची ही सर्व कामे आपण पूर्ण करुन घेऊत, निधीची चिंता करण्याचेही कारण नाही, असे प्रतिपादन आ. अर्जुनराव खोतकर यांनी येथे बोलतांना केले.÷
आ.श्री.खोतकर यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या 67 कोटींपैकी आज बुधवारी भिमराज प्रवेश व्दार ते जयनगर चौकापर्यंतच्या 15 मिटर रुंद सिमेंट रस्ता बांधकामासाठी चार कोटी 69 लक्ष 70 हजार रुपये, राष्ट्रमाता महाविद्यालय ते रेल्वे उड्डाणपुलातपर्यंतच्या सिमेट रोडचे बांधकाम करण्यासाठी 3 कोटी 50 रुपये आणि आरपी रोड ते अग्रसेन फाऊंशेडन म्हणजेच अब्दुल हमीद चौकापर्यंतच्या (कॉलेज रोड) सिमेंट रस्त्याच्या बांधकामासाठी 2 कोटी 15 लक्ष रुपयांच्या या कामांचा उद्घाटन सोहळा आ. श्री. खोतकर यांच्या हस्ते पार पडला. त्याप्रसंगी आ. श्री. खोतकर बोलत होते.
यावेळी माजी आ. अरविंदराव चव्हाण, माजी जि. प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर, अॅड. ब्रम्हानंद चव्हाण, पंडीतराव भुतेकर, राजेश राऊत, अभिमन्यू खोतकर, भाऊसाहेब घुगे, फिरोजलाला तांबोळी, अॅड. सुनिल किनगावकर, विष्णू पाचफुले, आत्मानंद भस्त, अॅड. भास्करराव मगरे, अमोल ठाकुर, शौळेश घुमारे, संतोषराव मोहिते, गणेशराव सुपारकर, डॉ. सुयोग कुलकर्णी, कालिंदाताई ढगे, सौ. सवितातार्स किवंडे, उज्जलाताई फोपलिया, शेख जावेद, दिनेश भगत, दिपक वैद्य, श्रीकांत पांगारकर, कुणाल जावधव, जफर खान पठाण, योगेश रत्नपारखे, कमलेश खरे आदींची उपस्थिीती होती.
पुढे बोलतांना आ. श्री. खोतकर म्हणाले की, आपण शहर विकासाच्या प्रश्नावर सातत्याने केंद्रित राहणार आहोत. तसेच जालना शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. असे सांगून ते म्हणाले की, जालना शहरातील खुल्या जागांचा विकास करण्यात येणार आहे. मोती तलाव व मुक्तेश्वर तलाव सौंदर्य करण्याचे कामे हाती घेण्यात आली आहेत. मुक्तेश्वर प्रवेशद्वार ते भाऊ साठे पुतळा व राष्ट्रमाता कॉलेज ते उड्डाण पुलापर्यंतच्या रस्त्याला करोडो रुपये खर्च होणार आहेत. त्यामुळे हे काम अत्यंत उत्कृष्ट पध्दतीने होणार आहे. या दोन्ही पर्याय रस्त्याचा मोठा फायदा शहरातील वाहतुक सुरळीत होेण्यावर होणार आहे. अनेक वर्षापासून रखडलेला कॉलेज रोडचा प्रश्न अखेर आपण आमदार झाल्यानंतर मार्गी लागला असल्याचेही ते म्हणाले.
या कार्यक्रमास सौ. वैशाली जांगडे, सौ. रंजना गोगडे, किशोरपांगारकर,निखील पगारे, विठ्ठल बनकर, रामअप्पा सतकर,संताजी वाघमारे, महेश दुसाने, मेघराज चौधरी, विजय जाधव, राहुल हिवराळे, रमेश टेकुर, नरेश खुदभैय्ये, राजू माधवले, संजय गायकवाड, अमोल राऊत, नजीरभाई, भोला कांबळे, लखन कणिसे, दिपक राठोड, मनोज लाखोले, जगदिश रत्नपारखे, दिनेश पाटील, सागर पाटील, शुभम टेकाळे, किशोर शिंदे, विक्रम कुसुंदल, अक्षय आटोळे, भूषण बनकर, अभिषेक काबलिये, सतोष परळकर, संजय डुकरे, प्रदीप गायकवाड, नेल्सन कांबळे, रवींद्र बुंदेले, किरण सिरसाठ, मयुर एखंडे, मनोज धानुरे, गोविंद सोनुने, सुशिल भावसार, ताहेर खान, अॅड. अशपाक पठाण, सगीर पहेलवान, अॅड. बबनराव मगरे, संदीप साबळे, सुनिल रत्नपारखे, अंकुश पाचफुले, शिवसिंग तिलवारवाले, शरद ढाकणे, आकाश जगताप, शिवा कोरे, सौरभ भिसे, मुसाभाई परसुवाले व प्रभागातील नागरीक, महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास महानगर पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपुत, उपायुक्त नंदा गायकवाड, शहर अभियंता सय्यद सऊद आणि गुत्तेदार एस. जी.देविदान इंफ्रा प्रा. लि. व शुभम् कंन्स्ट्रक्शन आदींची उपस्थिती होती.