vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

वंदे मातरम्” गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त ठाणे जिल्हा परिषदेत सामूहिक गायनाचा उत्साहपूर्ण कार्यक्रम संपन्न

“वंदे मातरम्” गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त ठाणे जिल्हा परिषदेत सामूहिक गायनाचा उत्साहपूर्ण कार्यक्रम संपन्न

ठाणे, प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे): भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारे आणि राष्ट्रभावनेचे प्रतीक ठरलेले “वंदे मातरम्” या गीतास आज १५० वर्ष पूर्ण झाली. या ऐतिहासिक गीताच्या गौरवशाली परंपरेला सलाम म्हणून जिल्हा परिषद ठाणे येथे आज “वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन” कार्यक्रम उत्साहात पार पडला.

    हा कार्यक्रम मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सांस्कृतिक कार्य मंत्री व कौशल्य विकास मंत्री यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता.

     जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या आवारात सकाळी हा कार्यक्रम पार पडला. सर्व अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांनी “वंदे मातरम्” गीत एकत्रित गाऊन राष्ट्रभक्तीचा आणि एकतेचा संदेश दिला.

     या कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अंजली अंबेकर, लेखाधिकारी (२) रविंद्र सपकाळे तसेच जिल्हा परिषदेचे विविध विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   प्रसिद्ध साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या “आनंदमठ” या कादंबरीतून उदयास आलेले “वंदे मातरम्” हे गीत अनेक क्रांतीकारकांच्या मनात स्वातंत्र्याच्या जाज्वल्य भावनेची ज्योत पेटविणारे ठरले. स्वातंत्र्यलढ्यातील हाक असो वा स्वातंत्र्योत्तर भारतातील एकता, राष्ट्रप्रेम आणि अभिमान या गीताने प्रत्येक भारतीयाच्या हृदयाला स्पर्श केला आहे

    कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्” या घोषणांनी परिसर दुमदुमवला. सामूहिक गायनाद्वारे ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रगीताला अभिवादन करून देशभक्तीचा संदेश दिला.

000

संबंधित पोस्ट

पर्यावरणपूरक वीज निर्मितीसाठी पुढाकार घ्या-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

शिष्यवृत्तीचे अर्ज 15 जून पर्यंत भरण्याचे आवाहन…

पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवात ‘आदर्श गाव’ संकल्पना राबवणार- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढाराज्यात 22 ते 25 एप्रिल 2025 या कालावधीतपंडित दीनदयाळ उपाध्याय मानव एकात्म हीरक महोत्सव…

सहकारी संस्थांच्या निवडणूक निर्णय अकारी निवडीसाठी31 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सेवाकर्मी पुरस्कार” कार्यक्रमात जिल्हा परिषद ठाणेची उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्रातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कार्यालयांमध्ये स्थान – १०० पैकी ८० गुणांकन…

vishwatmaklokswamivarta

१० वीची पुस्तके दान अभियानातून महिलांचे शैक्षणिक सक्षमीकरण; नागरिकांना सहभागाचे आवाहन-मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या संकल्पनेतून उपक्रम