भाजपा जालनाच्या वतीने भारतरत्न श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन..
जालना (प्रतिनिधी) : -भारताचे माजी पंतप्रधान श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपा जालनाच्या वतीने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.
याप्रसंगी भाजपा जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे, जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, महानगर जिल्हाध्यक्ष सतीष जाधव, प्रदेश निमंत्रित सदस्य विजय कामड, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सोपान पेंढारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय जनता पार्टी जिल्हा जालना सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळा माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आली आहे. यावेळी आ.संतोष पाटील दानवे, आ.नारायण कुचे,माजी आ.विलासबापु खरात, जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे यांची उपस्थिती राहणार आहे. हि कार्यशाळा दिनांक 26 डिसेंबर 2024 गुरुवार सकाळी 11.00 वा. भारती लॉन्स, बालाजी चौक, जालना येथे होणार आहे. तरी, सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळा साठी जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या उपस्थिती राहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांनी केले आहे बाबासाहेब पाटील कोलते भाजपा