vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार*

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार*

 

सातारा, प्रतिनिधी: शहीद वीर जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर आज सातारा तालुक्यातील कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद जवान शुभम घाडगे यांचे पार्थिव कामेरी गावी आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

शहीद जवान शुभम घाडगे यांचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर आमदार मनोज घोरपडे, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार नागेश गायकवाड, गट विकास अधिकारी सतीश बुद्धे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतीश हंगे यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.

पोलीस व सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि बँडपथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर तिरंगा ध्वज कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आला. वीरपत्नी अर्चना, मुलगी साईशा, आई मनिषा, वडील समाधान व भाऊ संजय यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर भाऊ संजय यांनी पार्थिवाला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.

यावेळी लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.00000

संबंधित पोस्ट

मालाड मालवणी मधील इमारत दुर्घटनेची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

विशेष सहाय्याच्या योजनांचे अनुदान डिबीटी प्रणालीद्वारे मिळणार*- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*पुढील १०० दिवसांमध्ये सामाजिक न्याय विभागाने करावयाच्या कामाचा घेतला मुख्यमंत्र्यांनी आढावा*

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुमारे महिनाभर पुढे गेल्यानंतर आज निवडणूक आयोगासमोरील शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाचा निर्णय देखील लांबणीवर….

vishwatmaklokswamivarta

31 ऑगस्टला महिलांसाठी जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन…

vishwatmaklokswamivarta

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्याने पुढील निर्णयाकडे महाराष्ट्राचे लक्ष.

vishwatmaklokswamivarta

नवीन इमारतीत मराठी भाषिक व्यक्तींना घरे खरेदी करण्यासंदर्भातील धोरण करणार- मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta