vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानस्थानिक बातम्या

उद्योग, व्यवसाय व आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३१ जानेवारी पर्यंत सादर करण्याचे आवाहन…

उद्योग, व्यवसाय व आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३१ जानेवारी पर्यंत सादर करण्याचे आवाहन…

 

मुंबई, प्रतिनिधी : केंद्र व राज्य शासन, विविध आस्थापना व त्यांचे अंगिकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, महापालिका, तसेच खासगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाचे तिमाही विवरणपत्र येत्या ३१ जानेवारी पर्यंत सादर करावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त अ. मु. पवार यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

दर तिमाहीअखेर (मार्च, जून, सप्टेंबर, डिसेंबर) विवरण सादर करणे बंधनकारक आहे. पंचवीस किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार कारखाने यांना सेवायोजन कार्यालये यांनी रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा कायदा १९५९ व अंतर्गत नियमावली १९६० नुसार मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ईआर-१ प्रत्येक तिमाही संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. तसेच ज्या उद्योजकांनी महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्या उद्योजकांनी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी. हे विवरणपत्र (ER-I) ऑनलाईन पध्दतीने https://rojgar.mahaswaym.gov.in या वेबपोर्टलवर सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर करुन ३१ जानेवारी, २०२५ पर्यंत विवरणपत्र (ईआर-१) सादर करावे,

मुंबई शहर जिल्हा अंतर्गत येणारे सर्व नियोक्ते, आस्थापना यांनी https://rojgar.mahaswaym.gov.in या वेबपोर्टलवर तिमाही विवरणपत्र ईआर १ सादर करण्याची दक्षता घ्यावी. या वेबसाइटच्या एम्प्लॉयर (List a Job ) या टॅबवर क्लिक करुन एम्प्लॉयर लॉगइनमध्ये युजर आयडी व पासवर्ड वापरून लॉगइन करावे आणि ईआर रिपोर्टमध्ये ईआर -१ या ऑप्शनवर क्लिक करुन तिमाही विवरणपत्र ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहिती , मार्गदर्शन अथवा तांत्रिक अडचण असल्यास mumbaicity.employment@gmail.com या ईमेलवर संपर्क करावा. ३१ डिसेंबर, २०२४ च्या तिमाही अखेर हजेरी पटावर असलेल्या सर्व मनुष्यबळाच्या माहितीचे विवरणपत्र ईआर ३१ जानेवारी, २०२५ पर्यंत महास्वयम वेबसाईटवर ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. हे विवरणपत्र ऑफलाईन स्विकारले जाणार नाही, असे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर यांनी कळविले आहे.0000

संबंधित पोस्ट

महानगरपालिका क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर वाहतूक नियोजन जाहीरनामा प्रसिध्द

राज्यातील ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये (उदा. ओला, उबर, रॅपिडो) अधिक शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेसाठी नवे नियम लागू

vishwatmaklokswamivarta

सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर स्मृति अभिवादन कार्यक्रमाचे आयोजनडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नात रमा तेलतुंबडे-आंबेडकर यांची विशेष उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी अलिबाग तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देवून केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

नदी सुशोभीकरणापेक्षा प्रदूषणमुक्तीवर अधिक भर; स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ लवकरच -पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत फेरीवाले, होर्डींग – बॅनर्स, वाहने यावर सातत्यपूर्ण धडक कारवाया

vishwatmaklokswamivarta