vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जळगाव रेल्वे दुर्घटना धक्कादायक असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी – केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले*

जळगाव रेल्वे दुर्घटना धक्कादायक असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी – केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले*

 

मुंबई प्रतिनिधी- जळगावहुन मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसच्या खाली चिरडल्यामुळे या प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला.जळगावमधील परधाडे स्टेशनजवळ हा भीषण अपघात घडला आहे.हा अपघात अत्यंत धक्कादायक असून या अपघाताची सखोल चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे. हा रेल्वे अपघात अत्यंत भीषण असून हृदयद्रावक आहे.या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची मनशक्ती प्राप्त होवो .मृतांच्या कुटुंबियांना सरकार ने सांत्वनपर निधी द्यावा अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

या दुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळ होत असून केवळ एका अफवेनं घात गेला अन् क्षणात १० प्रवाशांच्या कुटुंबीयांवर मोठं दु:ख कोसळलं आहे.प्रवशांचा गेलेला जीव पुन्हा येऊ शकत नाही. हा अपघात अत्यंत दुःखद आहे. या अपघातातील मृतांची कुटुंबियांची रेल्वे मंत्रालयाने सांत्वनपर निधी द्यावा. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी. असे अपघात पुन्हा होऊ नयेत यासाठी रेल्वे प्रशासनने खबरदारी घ्यावी आणि प्रवाशांनी ही दक्ष आसवे असे मत ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले. या भीषण अपघाताची पहिली माहिती या रेल्वेत प्रवास करणारे रिपब्लिकन कार्यकर्ते संदीप जाधव यांनी आपल्याला दिली आल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी दिल.

0000

संबंधित पोस्ट

येत्या काळात आरोग्य क्षेत्रातील सर्वच विभागांसाठी पुरस्कार सुरु करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर,कोल्हापूर येथे पहिल्या राज्यस्तरीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कारांचे वितरण संपन्न..

vishwatmaklokswamivarta

भारतीय हवाई दलाच्या चिनूक विमानांनी हिमाचल प्रदेशातील चंबा इथल्या मणिमहेश तीर्थक्षेत्रातून अडकलेल्या यात्रेकरूंना यशस्वीरित्या बाहेर काढले

vishwatmaklokswamivarta

कोकण किनारपट्टी सह मुंबई  पश्चिम उपनगरामध्ये तुफान मुसळधार पाऊस पडत अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या पाणी तुंबण्याची घटना समोर येत आहे

दरड कोसळल्याने किल्ले रायगडाचा पायरी मार्ग दोन दिवसांसाठी बंद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्तीसगड सीमेवरील दुर्गम कवंडे गावात- 12 कुख्यात नक्षल्यांची शस्त्रांसह शरणागती- आत्मसमर्पण केलेल्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यालाही उपस्थिती- सी-60 जवानांचा सत्कार, अत्याधुनिक एके-103 आणि पिस्तुले दिली- बुलेटप्रुफ वाहनांसह 19 वाहने पोलिसांच्या सेवेत- कोरमा नाल्यावरील आंतरराज्यीय पुलाची ड्रोनने पाहणी…

प्रगतीशील व प्रयोगशील शेतकऱ्यांशी कृषीमंत्र्यांनी साधला संवाद शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य- कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे