vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शिवजयंती सोहळ्याचा आरंभ : बुलढाण्यात उसळला शिवसागर..सत्कर्मालाच देव मानणारे छत्रपती शिवराय सर्वश्रेष्ठ- निवृत्ती महाराज इंदुरीकर

शिवजयंती सोहळ्याचा आरंभ : बुलढाण्यात उसळला शिवसागर..सत्कर्मालाच देव मानणारे छत्रपती शिवराय सर्वश्रेष्ठ- निवृत्ती महाराज इंदुरीकर

 

बुलढाणा: प्रतिनिधी-छत्रपती शिवाजी महाराज का श्रेष्ठ आहेत?.. तर त्यांनी उपास-तापास न करता किंवा कुठलाही आव आणून कर्मकांड न करता कर्मालाच देव मानले. ते सत्कर्मामुळे सर्वश्रेष्ठ बनले. त्यामुळे संपत्ती सोबतच दयाभाव ज्यांच्याकडे होता, तेच छत्रपती होते.. असे शिवगुणगाण महाराष्ट्रातले गाजलेले विनोदी किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी करुन, बुलढाणा येथील छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या शिव जयंती सोहळ्याचा आरंभ दणक्यात केला.

छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणाच्या वतीने २०२५ सालच्या शिवजयंती सोहळ्याचा आरंभ शुक्रवार १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ‘शिवनेरी’ जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल मैदानात ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्या शिवकीर्तनाने झाला. अवघ्या दोनच दिवसापुर्वी ठरलेल्या या शिवकीर्तनासाठी जवळपास १५ हजार शिवप्रेमींचा जनसागर उसळला होता. सर्वत्र छत्रपती शिवरायांचा गजर सुरु होता. या शिव कीर्तनासाठी पुरुषांसह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. एकीकडे सूर्य मावळत असतांना, शिवजयंती सोहळ्याची पहाट बुलढाण्यात उजाडत होती.

सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या मुर्तीचे पुजन व दिपप्रज्वलन कार्यक्रमाचे उद्घाटक धर्मवीर आमदार संजय गायकवाड व कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसाई पतसंस्थेचे मार्गदर्शक नेत्रतज्ञ डॉ.वसंतराव चिंचोले, दौलतराव नरवाडे यांच्यासह आयोजक शिवजयंती समितीचे अध्यक्ष राजेंद्र काळे, सचिव उमेश शर्मा, प्रमुख पाहुणे अ‍ॅड.दिनोदे, माजी अध्यक्ष रणजीतसिंह राजपूत, मृत्यूंजय गायकवाड डॉ.शोण चिंचोले, राजेश हेलगे, सुनिल सपकाळ, कोषाध्यक्ष अरविंद होंडे, निलेश भुतडा, प्रसिध्दी प्रमुख आदेश कांडेलकर, गोपालसिंग राजपूत यांच्यासह समितीचे पदाधिकारी व सांस्कृतिक समिती पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष सौ. पूजाताई संजय गायकवाड यांच्यासह तहसीलदार व विविध क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

ह.भ.प. इंदुरीकर महाराज पुढे बोलतांना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्याईने शेतकर्‍यांचे आई-वडील कुठेही वृध्दाश्रमात नाही. शेतकरी व गरीबांनी हा देश पिकवला. पोलिस, सैन्य, होमगार्ड आदी सेवेच्या क्षेत्रात गरीब व शेतकर्‍यांचीच मुले आहेत. छत्रपती शिवराय ग्रामविकास खात्याचे खरे निर्माते. छत्रपतींमुळेच देश अन् धर्म सुरक्षीत राहिला. सद्यस्थितीत शाळेमधून मोबाईल बंदीची खरी गरज आहे. आई-वडीलांची मान खाली जाणार नााही, असे जगा.. हीच खरी शिवजयंती, असेही ते म्हणाले. सुत्रसंचालन प्रा.अमोल वानखेडे यांनी केले. राष्ट्रगीताने शिवकीर्तनाची सांगता झाली.

संबंधित पोस्ट

यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत ई-केवायसी करु न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनस्तरावरुन देण्यात आलेले नाहीत. याबाबतचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही,असे महिला व बालविकास विभागातर्फे कळविण्यात आले

आज बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाल्याची धक्कादायक बातमी…

vishwatmaklokswamivarta

सहज व सोप्या भाषेत संविधानाची माहिती पुस्तक स्वरूपात उपलब्ध – राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावर आधारित ‘भारतीय संविधानाची अमृतमहोत्सवी वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

गणपती बाप्पा मोरया !! जीएसबी सेवा मंडळाने मिळवले २०२५ च्या गणेशोत्सवासाठी ४७४.६४ कोटी रुपयांचा विमा…

vishwatmaklokswamivarta