vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबईत घर खरेदी नोंदणीत मोठा घोटाळा, आरपीआय नेते बाळासाहेब मिरजे यांची कारवाईची मागणी..

नवी मुंबईत घर खरेदी नोंदणीत मोठा घोटाळा, आरपीआय नेते बाळासाहेब मिरजे यांची कारवाईची मागणी.

नवी मुंबई प्रतिनिधी

– नवी मुंबई येथे सदनिकांची बेकायदेशीर दस्त नोंद झाली आहे. ही दस्त नोंद एका दिवसात 102 इतकी झाली आहे. या प्रकारे दस्त नोंदणी झाल्याने या भ्रष्टाचारातून दुय्यम निबंधक 10 या कार्यालयातील अधिकारी या घटनेला जबाबदार आहेत. या प्रकारामुळे नवी मुंबईत घर खरेदी नोंदणीत मोठा घोटाळा झाला आहे अशा दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे मराठा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांनी केली आहे.   दरम्यान या घर नोंदणी घोटाळ्यातील ठाणे जिल्ह्यातील एका मंत्र्याचे पाठबळ असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

  या घोटाळ्यातील दुय्यम निबंध 10 या कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे असे ही त्यांनी सांगितले.  तसेच झालेल्या भ्रष्ट कारभारातील शेकडो नोंदणी रद्द करण्याची मागणी करण्यात येत असून या प्रकरणी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे.  नवी मुंबई येथील सानपाडा येथे 20 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ठाणे विभाग 10 दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीच्या भ्रष्टाचाराची फाईलच बाळासाहेब मिरजे यांनी पत्रकारांसमोर उघड केली. यावेळी त्यांच्यासोबत दत्तात्रय निंबाळकर, संगीता टाकळकर, चंदू पाटील आदी उपस्थित होते.   यावेळी बाळासाहेब मिरजे यांनी सांगितले की,अनधिकृत बांधकाम मधील सदनिकांचे दस्त नोंदणी करू नका, असे आदेश सह जिल्हा निबंधक वर्ग एक यांनी 4/ 11 /2024 रोजी काढला होता, तरीसुद्धा सहा डिसेंबर 2024 रोजी 102 दस्त नोंदणी एकाच दिवशी बेकायदेशीररित्या झाली. याप्रकरणी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने 11/ 12 /2024 रोजी सहनिबंधक वर्ग एक ठाणे जिल्हा यांच्याकडे रितसर तक्रार करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाच्या तक्रारीनंतर वर्ग एक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन एका समितीची स्थापना करून एक अहवाल तयार करण्यात आला. या अहवालामध्ये एका दिवसात झालेल्या 102 दस्त नोंदणी बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले.  नवी मुंबई मधील अनधिकृत बांधकाम अतिक्रमण वाढण्यास व सर्वसामान्यांची फसवणुकीस या विभागातील अधिकारी सिद्दिकी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. सिद्दिकी यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून सिडको महामंडळाचे सूचना व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करीत नाहीत व नियमांना डावलून स्वार्थ आणि मनमानी कारभार करीत असल्याचा गंभीर आरोप ही या पत्रकार परिषदेत करण्यात आला.

   यापुढे बाळासाहेब मिरजे म्हणाले की,झालेले दस्त नोंदणी त्वरित रद्द व्हावे , 6 डिसेंबर 2024 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय 10 तिथे काम करीत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची कसून चौकशी झाली पाहिजे या अधिकारी यांना जे पाठबळ देतात ,त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी ही यावेळी करण्यात आली .

संबंधित पोस्ट

पत्रकार चौक ते डीएसपी चौक येथे एलईडी पथदिव्यांचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

ठाणे जिल्हा प्रशासनाचा संकल्प: ‘सेवा पंधरवडा’**सेवा परमो धर्म: जनतेची कामे आता वेगवान..!*

vishwatmaklokswamivarta

राज्यातील बालिका आणि बालक आश्रमांचा सर्व्हे करून अवैध आश्रमांवर कठोर कारवाई करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे**डॉ. नीलम गोऱ्हे यांनी खडवली येथील लैंगिक अत्याचार प्रकरणी ठाणे जिल्हा महिला व बालविकास विभागाला भेट देत शासकीय निरीक्षण गृहाची केली पाहणी**संस्थेतील संशयास्पद नोंदींची चौकशी करा; बालिका आश्रमांवर देखरेख वाढवण्याचे निर्देश*

महाराष्ट्र आता थांबणार नाही…! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालानुसार महाराष्ट्र सर्वच आर्थिक क्षेत्रांमध्ये अग्रेसर; दिमाखदार वाटचालीसाठी नागरिकांचे अभिनंदन

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ‘कलाविष्कार २०२५’ साजरा,अधिकारी-कर्मचारी यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हा मंच महत्वाचा- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

vishwatmaklokswamivarta

🚨 महाड पूरपरिस्थितीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष आढावा