vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

दुबईतील अबुधाबी येथे शिवजयंती उत्सवात साजरी;शिवरायांचा इतिहास प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक -केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

दुबईतील अबुधाबी येथे शिवजयंती उत्सवात साजरी;शिवरायांचा इतिहास प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक -केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

 

विदेश प्रतिनिधी बुलढाणा,: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास प्रेरणादायी आणि समाजाला स्फूर्तीदायक असल्याच प्रतिपादन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी अबुधाबी येथे केले.

आखाती देशांमध्ये स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला इतिहासाची ओळख व्हावी, या दृष्टिकोनातून दुबईतील अबुधाबी येथे इन्स्पायर इव्हेंट अँड प्रमोशन व भारतीय स्थानिक रहिवाशी यांच्या संयुक्त विद्यमाने 23 फेब्रुवारीला बी ए पी एस हिंदू मंदिर अबुधाबी येथे शिवजयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे होते. तर अतिथी म्हणून मालोजी राजे शाहू छत्रपती, खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात बोलताना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा गौरवशाली असून आजच्या पिढीला प्रेरणा आणि स्फूर्ती देणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजवटीमध्ये लोकांच्या हिताची कामे केलीत. अशा स्वरूपाची कामे भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सातासमुद्र पार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव साजरा केला जातो. हे मराठी माणसासाठी आणि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यावेळी अबुधाबी येथील मराठी माणसांसोबत त्यांनी संवाद साधला. या कार्यक्रमाला अबुधाबी येथील मराठी कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुबई येथे महाराष्ट्र सदन बांधण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार- प्रतापराव जाधवआखाती देशात स्थायिक झालेल्या मराठी लोकांना एकत्र येऊन सामाजिक कार्यक्रम साजरी करता यावे यासाठी दुबईत महाराष्ट्र सदन बांधण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र स्तरातून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी अबुधाबी येथे नागरिकांशी संवाद साधताना दिली. यावेळी उपस्थितांनी जय भवानी, जय शिवरायचा जयघोष करून घोषणेचे स्वागत 0000000

000000

संबंधित पोस्ट

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा… सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगावॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील संरक्षण धोरण विषयक चर्चेचे 10 वे सत्र नवी दिल्लीत संपन्न

इथिओपियन संसदेला संबोधित केल्यानंतर, तेथील मंत्री आणि खासदारांशी संवाद साधल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला.

vishwatmaklokswamivarta

रोममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ मॅटारेला आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट,भारत-इटली संबंधांची वाढती व्याप्ती आणि महत्त्व अधोरेखित अनेक महत्त्वपूर्ण करार यावेळी आदान-प्रदान करण्यात आले.

संयुक्त अरब अमिरात दुबई, शारजाह आणि अजमान यांसारख्या शहरामध्ये मुसळधार पाऊस जनजीवन विस्कळीत..

vishwatmaklokswamivarta

बलुचिस्तानमधील स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर आता वझिरिस्तानमध्येही स्वतंत्र राष्ट्रासाठी आंदोलन सुरू