vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले कुणकेश्वराचे दर्शन आपली संस्कृती जपत परंपरा पुढे नेऊया – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले कुणकेश्वराचे दर्शनआपली संस्कृती जपत परंपरा पुढे नेऊया – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

राज्य प्रतिनिधी

सिंधुदुर्गनगरी : महाशिवरात्रीचा उत्साह संपूर्ण महाराष्ट्र, देशभरात कालपासून सुरू झाला आहे. सगळीकडे महादेवाच्या मंदिरामध्ये लाखो शिवभक्त श्रद्धेने पूजा-अर्चना करत आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. राज्यात अनेक मोठी तीर्थक्षेत्र आहेत. आणि त्या तीर्थक्षेत्रामध्ये ठरलेल्या मुहूर्तावर यात्रा, पूजा होत असतात. सण, उत्सव आपली परंपरा आहे. आपल्याला आपली संस्कृती आणि परंपरा पुढे घेऊन जायची असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवदर्शन घेतले. दर्शनानंतर श्री शिंदे यांचा पालकमंत्री नितेश राणे आणि मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, आमदार रविंद्र फाटक, आमदार भैया सामंत आदी उपस्थित होते.श्री शिंदे म्हणाले, कुणकेश्वर येथे दर्शनासाठी येण्याची माझी खूप इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली. कोकणाच्या विकासाला शासनाने नेहमी प्राधान्य दिले आहे. कोकणात नवनवीन प्रकल्प आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि नागपूर ते मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपण तयार केला आहे अशाच प्रकारचा द्रुतगती महामार्ग मुंबई ते सिंधुदुर्ग आपण करतोय त्यामुळे या भागातील विकासाला चालना मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटन वाढीसाठी सर्वस्वी प्रयत्न करणार आहोत. पर्यटनाला चालना दिली तर तरुणांना जिल्ह्यातच काम मिळेल असेही ते म्हणाले.

 

संबंधित पोस्ट

जागतिक जल दिनानिमित्त वॉकेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद जलसंकट दूर करण्यासाठी सगळ्यांचा सहयोग आवश्यक-राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर 

जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याअंतर्गतपीक पध्दती, पाण्याचे नियोजनाबाबत चर्चासत्र संपन्न..

बाह्ययंत्रणेद्वारे २ हजार ८४३ पदे; अंगणवाडी सेविका व मदतनीस २ लाख २१ हजार ३२८ पदास मंजुरी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय; तब्बल २३ वर्षांनंतर नियमित ८ हजार ६६९ पदांच्या आकृतीबंधास मंजुरी

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख-बुलढाणा जिल्हा: महसूल प्रशासन आणि डिजिटल क्रांतीचा नवा अध्याय

ॲडव्हान्टेज महा.एक्स्पो-२०२६ च्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा…

vishwatmaklokswamivarta

पर्यटन वृद्धीसाठी महिला केंद्रीत ‘आई’ धोरण

vishwatmaklokswamivarta