vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

१०० डे ‘ उपक्रमांतर्गत सर्व पोलीस ठाण्याचा चेहरामोहरा बदलणार..

‘ १०० डे ‘ उपक्रमांतर्गत सर्व पोलीस ठाण्याचा चेहरामोहरा बदलणार..

 

( सुरेश गायकवाड ) प्रतिनिधी

मुंबई – सरकारच्या ‘ १०० डे                             उपक्रमांतर्गत सर्व सरकारी कार्यालयासह पोलीस ठाण्याच्या इमारतीचे नुतनीकरण, साफसफाई, रंगरंगोटी आतील आणि बाहेरील बाजूस स्वच्छता नवीन सुधारणा,विद्युत वायर बदलणे, शौचालयाची स्वच्छता, विद्युत सुधारणा,झाडे ,फुले ,वेली यासारखे आधुनिकतेचे स्वरूप आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलीस हा उपक्रम जनतेच्या माध्यमातून राबवित आहे.

  यासाठी पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील, परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर तसेच घाटकोपर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश पासलवर यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांनी पोलिस ठाण्याच्या संपूर्ण इमारतीचा आणि परिसराचा चेहरा बदलण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आणि सध्या हे काम सुरू झाले असून लवकरच पूर्ण होणार आहे. नागरिक तक्रारी घेऊन येतात तो ठाणे अंमलदार कक्षही आधुनिक केला जात असल्याने यापुढे त्याचे स्वरूप बदलणार आहे. त्यामुळे संपूर्ण पोलीस ठाण्याचा चेहरामोहरा बदलला जाणार असल्याचे काळदाते यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

नमुंमपा निवडणूक 2025-2026 करिता मतदान अधिका-यांच्या प्रशिक्षणास नेरुळ विभागापासून प्रारंभ-प्रशिक्षणास गैरहजर कर्मचा-यांवर कायदेशीर कारवाई

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण..

vishwatmaklokswamivarta

जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्र्यांच्या हस्ते संविधान उद्देशिका कोनशिलेचे अनावरण

भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्ह्याची अत्यंत महत्वाची बैठक-जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

नवी मुंबई महापालिका मुख्यालयात 17 ऑगस्टपर्यंत ‘तिरंगा आणि वंदे मातरम्’ विषयक माहितीपूर्ण प्रदर्शन