vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

सन 2024-25 “विभागीय हातमाग कापड स्पर्धा” चे आयोजन

सन 2024-25 “विभागीय हातमाग कापड स्पर्धा” चे आयोजन

ठाणे, प्रतिनिधी राज्यातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याकरिता व विणकरांनी उत्पादित केलेले उत्कृष्ट वाणाला सन्मान मिळावा, या दृष्टीकोनातून मुंबई विभागात प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग मुंबई यांच्यामार्फत दि.19 मार्च 2025 रोजी दुपारी 3 वाजता विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

विभागीय हातमाग कापड स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस पात्र नमुन्याला अनुक्रमे रूपये 25 हजार, रूपये 20 हजार व रूपये 15 हजारांचे बक्षीस देण्यात येईल.

हातमाग कापडाचे नमुने सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत दाखल करावे. वेळेनंतर आलेले नमुने स्विकारले जाणार नाही. नमुन्यावर त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, वापरण्यात आलेल्या धाग्याचा प्रकार, डिझाईन, रंग व कापडाची विशेषतः असे कापडाचे विवरण किंमतीसह देणे आवश्यक आहे. स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विणकरांनी कमीत कमी 1 नग व मिटरमध्ये कमीत कमी 2 मिटर कापड स्पर्धेकरिता आणावे.

प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग मुंबई हे राज्य शासनाचे कार्यालय असून सर्व हातमाग विणकरांनी सहभाग घेवून लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग मुंबई, भोरुका चॅरीटेबल ट्रस्ट, ट्रान्सपोर्ट हाऊस, 5 वा मजला, 128- ब पुना स्ट्रीट, मस्जिद (पूर्व) 400009 कार्यालयाच्या पत्यावर किंवा rddtextiles3mumbai@rediffmail.com या ईमेलवर व 022-23700611 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वस्त्रोद्योग सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.00000

संबंधित पोस्ट

जनकल्याण दहिसर एसआरए सहकारी गृह संस्थेतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात २७ जानेवारीपासून उपोषण करणार

vishwatmaklokswamivarta

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय,: रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांबाबत नियमाचे पालन न केल्यास कारवाई होणार

अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमधील नोकरभरती संदर्भात अहवाल सादर करावा- आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके

एल्डर लाईन” 14567– ज्येष्ठांसाठी मदतीचा आधार

vishwatmaklokswamivarta

गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१जिल्ह्यात ८४ मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन