
#ऐरोलीत_दिवसाढवळ्या_गोळीबार,
#दोन_जण_जखमी
प्रतिनिधी,
ऐरोली सेक्टर ३ येथे संध्यकाळी ६.३० वाजता भगवान पाटील या व्यक्तीने दिवसाढवळ्या आपल्या मुलांवर गोळीबार केला. यामध्ये एका मुलाला २ गोळ्या लागल्या तर एक मुलाच्या कंबरेला गोळी चाटून गेली असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
ऐरोली सेक्टर ३ येथील भोस्कर भवन शेजारी राहत असलेले निवृत्त पोलीस कर्मचारी भगवान पाटील यांनी आपल्या राहत्या घरी त्यांच्या २ मुलांवर रिव्हॉल्वर च्या सहाय्याने ३ वेळा गोळीबार केल्याची धक्कादायक घटना आज ऐरोलीमध्ये घडली. गोळी झाडणारे भगवान पाटील (७०) हे नवी मुंबईतील निवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. घरातील आपापसातील वादामध्ये हि घटना घडली असल्याचे समजते. पाटील यांचा मुलगा सुजय हा वसई मध्ये वास्तव्यास आहे तर दुसरा मुलगा ऐरोलीमध्येच राहतो. भगवान पाटील यांनी कॉल करून सुजय ला बोलावून घेतले व घरातील आपापसातील भांडणांमध्ये भगवान पाटील यांनी त्यांच्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून त्यांच्या दोन्ही मुलांच्या दिशेने ३ गोळ्या झाडल्या. यामध्ये मुलगा सुजय याला २ गोळ्या लागल्या तर दुसरा मुलगा विजय याच्या कंबरेला गोळी चाटून गेली. सुजय याला इंद्रावती रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
भगवान पाटील यांनी मद्यप्राशन केले होते. पाटील यांच्या कौटुंबिक वादातून हि गोळीबारची घटना घडली असून, पाटील हे निवृत्ती पोलीस कर्मचारी असून यांच्याकडे परवाना असलेल्या सर्व्हिस रिव्हॉल्वर च्या साहाय्याने त्यांनी हा गोळीबार केला असून यामध्ये दोन मुलेजखमी झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यावेळी रबाळे पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पवार, पोलिस निरीक्षक (गुन्हा) उमेश गवळी, पोलिस उपनिरीक्षक अमित शेलार आणि रबाळे पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन, भगवान पाटील यांना अटक केली असून पुढील तपास सुरु असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.



