vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचाकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून आढावा..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचाकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून आढावा..

 

            मुंबई, प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. या अनुयायांना उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी-सुविधांच्या पूर्वतयारीचा आढावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी

 

घेतला.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीबाबत आढावा बैठक श्री. आठवले यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती.

 

या बैठकीस मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशांत सपकाळे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सो. ना. बागुल, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले की, चैत्यभूमी येथे अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई महापालिका, गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. प्रत्येक विभागाने दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी. गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी.

 

चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायींना उच्च दर्जाच्या सुविधा पुरवाव्यात, अशा सूचना मंत्री श्री. केसरकर यांनी दिल्या.

 

चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्ककडे येणारे रस्ते व त्यावरील वाहतुकीचे नियंत्रण, सुरक्षाव्यवस्था, अनुयायांकरीता पिण्याचे पाणी, शौचालय आदींची सुविधा, परिसर स्वच्छता, सीसीटीव्हीची व्यवस्था, विद्युतव्यवस्था, भोजन व्यवस्था, आरोग्य सुविधा याबाबत बैठकीत आढावा घेण्यात आला. महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची सादरीकरणाद्वारे माहिती यावेळी देण्यात आली

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र कोरोनाच्यातिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर , 24 तासांत नवे रुग्ण वाढले. मुंबईतली रुग्णसंख्याही हजारावर पोहोचली , जानेवारी-फेब्रुवारीत रुग्ण वाढणार आहेत, असा धोक्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला.

vishwatmaklokswamivarta

कोतवाल पद भरतीसाठी 6 जुलै रोजी परिक्षा जालना शहरातील 14 परिक्षा केंद्रांवर होणार परिक्षा

vishwatmaklokswamivarta

सिडकोने जारी केली नवी मुंबईतील बेकायदा 529 बांधकामांची लिस्ट लवकरच कारवाई होणार…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार, गृह मंत्रालयाने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरसाठी अतिवृष्टी, पूर, ढगफुटी आणि भूस्खलन यामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथके स्थापन

मराठा आरक्षणाचा मुद्दा :मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस…

vishwatmaklokswamivarta

सीरम इंस्टिट्यूटला मोठा झटका; लहान मुलांसाठीच्या लसींच्या ट्रायल्सला परवानगी देण्याबाबत सरकारी पॅनला मोठा निर्णय.