vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याच्या निषेधादरम्यान झालेल्या संघर्षात ३ जणांचा मृत्यू..

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याच्या निषेधादरम्यान झालेल्या संघर्षात ३ जणांचा मृत्यू..

 

राज्य प्रतिनिधी-

 

झी न्यूज टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील धुलियान येथे वक्फ (सुधारणा) कायद्याविरुद्ध निदर्शने करणाऱ्या लोकांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला.

वृत्तसंस्था एएनआयने वृत्त दिले आहे की पश्चिम बंगाल पोलिसांनी मुर्शिदाबाद येथेही तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे, जिथे वक्फ कायद्याविरुद्ध निदर्शने हिंसक झाली.

पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक-शुक्रवारीही मुर्शिदाबाद येथे लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर जमले होते. या लोकांकडून वक्फ कायद्याला विरोध करण्यात आला होता. आंदोलनकर्ते वक्फ कायद्याविरोधात घोषणाबाजी करत होते. आंदोलनादरम्यान समशेरगंज याच परिसरात असणाऱ्या धुलियम भागातील राष्ट्रीय महामार्ग-12 अडवून धरला. मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. काही वाहनांची जाळपोळही करण्यात आली होती. यात एकूण 10 पोलीस अधिकारी जखमी झाले होते.

शनिवारी हीच हिंसा धुलियान या भागापर्यंत वाढली. या भागात एका व्यक्तीला गोळी लागल्याची माहिती मिळते आहे. स्थितीवर नियंत्रण मिळवता यावे म्हणून पोलीस लाठीमार, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सर्व घडामोडी घडत असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वक्फ कायद्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पश्चिम बंगालमध्ये हा कायदा लागू होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. “ज्या कायद्यामुळे लोकांत नाराजी आहे, तो कायदा आम्ही बनवलेला नाही. हा केंद्र सरकारने तयार केलेला कायदा आहे. मी याआधीच स्पष्ट केलेलं आहे की, पश्चिम बंगालमध्ये या कायद्याची अंमलबजावणी होणार नाही. मग हा हिंसाचार कशासाठी केला जातोय,” असं ममता बॅनर्जींनी म्हटलंय.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेतशेतकरी गट व वराह पालनाचा समावेश- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

मक्काच्या गंजीला आग – शेतकर्‍याचे नुकसान- शेतकर्‍याला नुकसान भरपाई द्या – उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणातर्फे बुधवारी (दि.१०)विशेष ग्राहक जनजागृती कार्यशाळा

सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी महत्वाकांक्षी सायबर सुरक्षा प्रकल्प- गृह राज्यमंत्री योगेश कदम

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतले दर्शन▪️उपमुख्यमंत्र्यांनी केली देहू येथे संत तुकाराम महाराज पादुकांची विधीवत पूजा

परभणी जिल्ह्याच्या विकासाला गती; विविध योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण बदल – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर