vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलामार्फत आज आपत्ती व्यवस्थापन परिचय प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात हा कार्यक्रम आज पार पडला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के व राष्ट्रीय आपदा मोचन दलाचे आर. जे. यादव हे यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवून प्रशिक्षीत करण्यात आले. नैसर्गिक आपत्ती प्रसंगातील आपली जबाबदारी, सामुहिक जबाबदारी, आपत्ती प्रसंगातील संवाद माध्यमांचा वापर, माहितीचे आदानप्रदान इ. विषयी माहिती देण्यात आली. तसेच तातडीचे वैद्यकीय उपचार, मदत व बचाव कार्य, अडकलेल्या व्यक्तिंच्या सुटका इ. विषयी माहिती देण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन व मदत कार्याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले.

संबंधित पोस्ट

मेळघाटच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊमंत्री उदय सामंत, प्रकाश आबिटकर यांचे आश्वासनउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दूरध्वनीवरून संवाद..

पार्थिव शिवलिंग निर्मिती सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मानकापुरातील उपक्रमात हजारोंचा सहभाग; मुख्यमंत्र्यांनीही केली तीन शिवलिंगांची निर्मिती

लातूर जिल्ह्यात उदगीर, निलंगा नगरपरिषद व रेणापूर नगरपंचायत क्षेत्रात 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान…

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री आवास योजनेच्या 5 लाख घरांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते15 मे रोजी लोकार्पण- ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना माहिती भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई तत्काळ वितरित करावी – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे खरीप २०२५ हंगामातील पीक विमा निश्चितीसंदर्भात मंत्रालयात बैठक