vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अनुसूचित व नवबौद्ध मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू

अनुसूचित व नवबौद्ध मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू

        सांगली, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सांगली जिल्ह्यामध्ये अनुसूचित व नवबौद्ध मुलां / मुलींच्या 200 क्षमता असणाऱ्या शासकीय निवासी शाळा कार्यरत आहेत. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळांमध्ये ऑफलाईन (मॅन्युअली) प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. प्रवेश अर्ज शासकीय निवासी शाळा व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सांगली येथे उपलब्ध असल्याचे समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

     इयत्ता 6 वी ते 10 वी सेमी इंग्रजी माध्यम या वर्गासाठी तसेच 5 वी पास मुला/मुलींसाठी मुलांची शासकीय निवासी शाळा कवठेएकंद, विटा, कवठेमहांकाळ व कडेगाव तर मुलींची शासकीय निवासी शाळा बांबवडे व जत या निवासी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.

     सांगली जिल्ह्यातील मुला/मुलींच्या शासकीय निवासी शाळांमध्ये विद्यार्थी/विद्यार्थिनींना कोणतीही फी न घेता मोफत प्रवेश दिला जातो. निवासी शाळेत मुला/मुलींना सुसज्ज शासकीय इमारतीत निवास, निवास साहित्य, भोजन, दैनंदिन वापराचे साहित्य, पाठ्यपुस्तके, वह्या, इतर शैक्षणिक साहित्य व गणवेश अशा प्रकारच्या सुविधा मोफत दिल्या जातात. विद्यार्थी/विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाकरिता सुसज्ज अद्ययावत वर्ग खोल्या, ग्रंथालय, व्यायामशाळा, ई-लर्निंग, मनोरंजन कक्ष इत्यादी सोयी सुविधेसह विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.

   प्रवेशासाठी प्रवर्गनिहाय जागा आरक्षित व मर्यादित असून अनुसूचित जाती व नवबौद्ध 80 टक्के, अनुसूचित जमाती 10 टक्के, विजाभज 5 टक्के, दिव्यांग 3 टक्के, एस.बी.सी. 2 टक्के याप्रमाणे शासकीय निवासी शाळेत प्रवेश निश्चित केला जातो. प्रवेशासाठी शाळेचे मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

       निवासी शाळानिहाय मुख्याध्यापकांचे नाव व कंसात त्यांचा संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे. (१) मुलांची शासकीय निवासी शाळा कवठेएकंद ता. तासगांव – पी. सी. भातलंवडे (9284801040). (२) मुलांची शासकीय निवासी शाळा विटा ता. खानापूर – प्रीतम भोसले (7028010118). (३) मुलांची शासकीय निवासी शाळा कवठेमहांकाळ ता. कवठेमहांकाळ – डी. बी. धवसे (9420836631). (४) मुलांची शासकीय निवासी शाळा वांगी ता. कडेगांव – एस. एच. भोसले (8698029878). (५) मुलींची शासकीय निवासी शाळा बांबवडे ता. पलूस – तानाजी करचे (9766040998). (६) मुलींची शासकीय निवासी शाळा जत ता. जत – डी. डी. जाधव (8275207276).

00000

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी यांनी केली वेश्वी येथिल शासकीय रोपवाटिकेची पाहणी…

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने आयोजित ‘खासदार क्रीडा महोत्सवा’स पुणे येथे सुरूवात, 15 दिवस 35 स्पर्धांचे आयोजन विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना आरोग्य संपन्नतेलाही तितकेच महत्त्व – मुरलीधर मोहोळ क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून पुण्यातील क्रीडा संस्कृतीला मिळणार बळकटी – अंजली भागवत

vishwatmaklokswamivarta

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंचन पाणीपट्टी वाढ अंतिम निर्णय येईपर्यंत स्थगितच राहणार – जलसंपदा मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील,पाणी पुरवठा सहकारी संस्थांचे रूपांतर पाणी वापर संस्थांमध्ये होणार नाही कालवा सल्लगार समितीच्या बैठकीत कोल्हापूर पाटबंधारे विभागातील चार प्रकल्पांचा आढावा..

सहकारी संस्थांच्या निवडणूक निर्णय अकारी निवडीसाठी31 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अवैध विदेशी मद्य वाहतुकीवर कारवाई; २.२२ कोटींचा मुद्देमाल जप्त

vishwatmaklokswamivarta