vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

वेव्हज मध्ये भारताला सर्जनशील आशय सामग्रीमध्ये जगाचे नेतृत्व करण्याची संधी गवसेल” अभिनेते अल्लू अर्जुन यांनी व्यक्त केला विश्वास…

वेव्हज मध्ये भारताला सर्जनशील आशय सामग्रीमध्ये जगाचे नेतृत्व करण्याची संधी गवसेल” अभिनेते अल्लू अर्जुन यांनी व्यक्त केला विश्वास…

 

मुंबई, प्रतिनिधी :- जिओ वर्ल्ड सेंटर येथील दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) २०२५ मध्ये सुप्रसिद्ध अभिनेते अल्लू अर्जुन मंचावर येताच या स्वप्ननगरीत चैतन्य सळसळले. टीव्ही ९ नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी सूत्रसंचालन केलेले ‘टॅलेंट बियॉन्ड बॉर्डर्स’ हे बहुप्रतिक्षित ‘परस्परसंवादी’ सत्र प्रसिद्धीचे वलय, अस्तित्व आणि चैतन्य या विषयातील एक हृदयस्पर्शी मास्टरक्लास बनले.

कथाकथनात भारताच्या वाढत्या जागतिक कथनतंत्रातील दीपस्तंभ म्हणून अल्लू अर्जुन यांनी या शिखर परिषदेचे कौतुक केले. “भारताकडे नेहमीच चैतन्य होते. आता, आपल्याकडे वेव्ह्ज मंच आहे,” याकडे त्यांनी लक्ष वेधताना “वेव्हज भारतासाठी सर्जनशील आशय सामग्रीमध्ये जगाचे नेतृत्व करण्यासाठी एक संधी असेल” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुष्पा चित्रपटातील अभिनेत्याने सहा महिन्यांच्या विश्रांती घेण्यास भाग पडलेल्या आणि आयुष्य बदलून टाकणाऱ्या अपघाताचा उल्लेख केल्याने हे संभाषण अधिक भावनिक झाले. “तो विराम हा एक आशीर्वाद होता,” हे नमूद करताना ते म्हणाले, “यामुळे मी माझी दृष्टी धाडसाकडून मतितार्थाकडे वळवली. मला जाणवले की स्नायू कमजोर होत असताना, प्रभुत्व वाढले पाहिजे. अभिनय ही माझी नवीन सीमा बनली.”

त्यांनी दिग्दर्शक अ‍ॅटलीसोबतच्या आगामी प्रकल्पाची माहिती दिली आणि त्याला “भारतीय भावनेत रुजलेला दृश्य देखावा” असे संबोधले. “आम्ही आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाचा देशी चैतन्याशी मिलाफ करत भारतासाठी आणि भारताकडून जगासाठी एक चित्रपट देत आहोत,” असे सांगताना त्यांच्या डोळ्यात उत्कटता दिसली.

या संभाषणात निरंतर विकसित होणाऱ्या उद्योगात तग धरून राहण्याच्या आव्हानांचाही समावेश होता. “प्रत्येक भाषेत प्रतिभावान तरुण कलाकार उदयास येत आहेत. प्रामाणिक राहिले पाहिजे, कामाबाबत आस असली पाहिजे आणि अष्टपैलू असले पाहिजे,” असा सल्ला त्यांनी दिला. “हा फक्त एक उद्योग नाही, तर सर्जनशीलता, लवचिकता आणि उत्क्रांतीची युद्धभूमी आहे” असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

संबंधित पोस्ट

अकोल्याचे वैभव सांगळे यांची चित्रकला जनपथ प्रदर्शनात ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू

vishwatmaklokswamivarta

अखेर अभिनेते नाना पाटेकर, नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्धीकी निर्माता आणि राकेश सारंग दिग्दर्शक यांना न्याय मिळाला. 

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित  ‘ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ‘राजा शिवाजी’सिनेमाचं वादळ, मोडले कमाईचे रेकॉर्ड्स!

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग अन् प्रखर राष्ट्र व धर्म निष्ठा लोकांपर्यंत पोहोचूया!‘छावा’ चित्रपटाला करमुक्त करण्याची हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे मागणी !

vishwatmaklokswamivarta

६४ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाच्या विभागीय पारितोषिक वितरण सोहळ्यात रंगकर्मींचा होणार सन्मान३० जून रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे हौशी मराठी नाट्य, बालनाट्य व प्रथम मराठी एकांकिका स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांचा गौरव

चतु:रस्त्र अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा यंदाचा गंधार गौरव पुरस्कार देऊन सन्मान, स्वरा जोशी हिला ही गंधार बाल पुरस्कार प्रदान.

vishwatmaklokswamivarta