vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पाळीव श्वान मालकांनी श्वान परवाना घेणे बंधनकारक

पाळीव श्वान मालकांनी श्वान परवाना घेणे बंधनकारक

 

       राज्य प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वान मालकांना या जाहीर प्रकटनाव्दारे कळविण्यात येते की, महाराष्ट्र महानगरपालिकाअधिनियम 1949 मधील प्रकरण 11, कलम 149(1) व 127 कलम 2 (क) अन्वये ‘नमुंमपा कुत्र्यावरील कर नियमन 1993’ ही उपविधी लागू करण्यात आलेली आहे. या उपविधीस शासन निर्णय क्र.एनएमसी1692/410/सीआर48/92 नवि-20, दि.28 मे 1993 अन्वये शासन मान्यताही मिळालेली आहे.

   सदर उपविधीनुसार विभाग कार्यालयांमार्फत श्वान परवाने देण्याची कार्यवाही करण्यात येते. त्या अनुषंगाने सर्व पाळीव श्वान मालकांनी श्वानपरवाना प्राप्तीसाठी www.nmmc.gov.in या वेबसाईटवर ‘नागरिक सेवा’ सेक्शनमध्ये आरोग्य विभागाच्या सेक्शनला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

  नमुंमपा कार्यक्षेत्रातील पाळीव श्वान मालकांनी श्वान परवाना घेणे बंधनकारकआहे. त्यामुळे अनधिकृतपणे श्वान पाळणाऱ्या मालकांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

संबंधित पोस्ट

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय,: रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांबाबत नियमाचे पालन न केल्यास कारवाई होणार

घणसोलीतील सिम्प्लेक्स सोसायटीसाठी क्लस्टरला मंजुरी,माथाडींच्या साडेतीन हजार धोकादायक घरांचा पुनर्विकास होणार नवी मुंबई महापालिकेने प्रसिध्द केली अधिसूचना…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश म्हस्के, जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या प्रयत्नांना यश

रुग्ण केंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर द्यावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

बळीराजाच्या कल्याणासाठी शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच लोकप्रतिनिधींनीही एकत्रित पुढाकार घ्यावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी..

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका लोककल्याण मेळावा अंतर्गत फेरीवाल्यांसाठी अन्न सुरक्षा प्रशिक्षण संपन्न..