शास्त्र आणि रूढी परंपरा….
हिंदू समाजात ब्रम्ह विवाहाला विशेष महत्व असून कारण ब्रम्ह विवाहात गुरु वडिलदारी जवाबदारीने आणि एक सामान्य युवक गृहस्थ होऊन जवाबदार घेतल्याने आणि एक मुलगी सुहासिनी म्हणून परिवर्तन होतात. असल्या श्रेष्ठ परंपरा हिंदू संस्कार आहे.
विवाह संस्कार शास्त्रोक्त आणि रीती रिवाजाने जवाबदारिचे कार्य गुरु आणि वडिलदारांचे कर्तव्य आहे.
पूर्वी विवाह विधी 11, 7, 5, असा दिवस घरात विधी विधान विवाह कार्य श्रद्धा भक्तीने करत होते. हल्ली या युगात एका दिवसात विधी विधान आणि शास्त्रोक्त विवाह कार्य करायला वेळच नाही किंवा महत्व देत नाही.
कारण शास्त्रोक्त विधी विधान पेक्षा मौज देखावाला पैसे खर्च करणारे जास्त झालेत.
विवाह कार्य शास्त्रोक्त विधी विधान करण्या जागी संगीत, नृत्य, असभ्यगीत यात वेळ खर्च करतात.
अजून एक विशेष सांगायचं म्हणजे
धर्मशास्त्र, वैदिक शास्त्रात उल्लेख आहे कि विवाह संस्कार हा मंत्र सहित अनिर्वाय होय, हा एक महत्वाचे धार्मिक विधी असल्याने आणि दोन जीव एक होऊन गृहस्थाश्रम प्रवेश करून त्यांच्या परिवाराचे जवाबदार आणि वंश वाढविण्या साठी संसार सागराच्या नौकात बसून प्रवेश करतात मग शास्त्रोक्त विधी विधान वेदविद्वान पुरोहिताकडून करावा असे शास्त्र सांगते. अलीकडे मूळ शास्त्र मंत्र विधीला प्राधान्य कमी देऊन इतर अलंकार देखाव्याकडे अधिक लक्ष दिल्या जाते. मूळ विधी स्वरूप अवघड आहे. कारण या मध्ये कर्ता यजमान असतो ज्याला मंत्रोक्त विधी समजत नसल्याने पुरोहिताला गुरुजीला हा संपूर्ण विवाह संस्कार विधी यजमान व काही विवाह विधी वधू वर कडून करावयाचा असतो.
अलीकडेच प्रसार माध्यमातून दाखविल्या प्रमाणे इतर ज्ञाती विभागांचा प्रभाव यामुळे विवाहसोहळ्यात वैदिक शास्त्र पद्धती सोडून यजमानाला खुश करण्यासाठी आणि काही ते प्रकार केल्या जातात.
मोठ्या शहरामध्ये मंगल कार्यालय तथा वेळ या अनुसार संपूर्ण विवाह विधी नको त्या ठिकाणी तोडून रुचेल या अनुषंगाने केला जातो.
बर्याच ठिकाणी विवाह मुहूर्त अभिजात असेल तेथे अक्षता मुहूर्त नसताना काही वैदिक अभ्यासक नसलेले काही पुरोहितांनी देव अक्षता म्हणून दोन तीन तास अगोदर विवाह अक्षता सर्व विधी आधीच आटोपले जातात. शेवटी लौकिक अर्थाने सुलग्न लावले जाते. या शिवाय लहान सहान फरक हे त्या त्या ठिकाणी संमिलीत करावे लागतात. असे असताना विवाह विधीचा क्रम हा ध्यानी ठेवला जात नाही जे प्रशस्त नाही.
विवाह शास्त्र विधी मध्ये दिलेल्या मूळ विधी व मंत्र प्रयोगाला कुठेही विळखा दोष न लागू देता संपूर्ण विवाह विधी शास्त्र शुद्ध पद्धतीने केल्याने त्या वधू वरांना आणि विवाह विधी केलेले पुरोहितांना शुभ फल मिळत असतात.
त्या साठी विवाह कार्याचा मुख्य यजमानांना हा पवित्र विवाह विधीचे किंवा कोणाच्याही कर्मकांड पूजा विधीचे पूर्ण माहिती देवून शास्त्रोक्त विधी विधान केल्याने एक कल्याण कार्यामुळे सर्वाना चांगलं फळ मिळणारच.