vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

आज शाकंभरी पौर्णिमा 

आज शाकंभरी पौर्णिमा

 

अध्यात्मिक वार्ता-

पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हटलं जातं. संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणार्‍या दुर्गेचं एक रूप म्हणजे शाकंभरी देवी होय. तिला हजारो डोळे होते म्हणून शाकंभरी असे नाव पडलं. या पौर्णिमेनिमित्तानं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यात्रा आणि उत्सवांचं आयोजन करण्यात येतं. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंग देवी गडावर शाकंभरी उत्सवाचे आयोजन करण्यात येतं.तीन दिवसांच्या श्री लक्ष्मी-नारायण महायागच्या कालावधीत दररोज मुख्य दोन सत्रामध्ये महायज्ञ व होम हवन, धार्मिक, विधी आदी धार्मिक कार्यक्रम होतात.

श्री सप्तशृंग निवासिनी देवी ही सह्याद्रीच्या सात डोंगराच्या कुशीत वसलेली असून, ते सात डोंगर म्हणजे मधू, कैटभ, शुंभ, निशुंभ, चंड व महिषासूर असून या राक्षसांचा विनाश करून श्री भगवतीने सृष्टीतील सर्व चराचरांना अभय, वरद प्रदान केले. या सात राक्षसांचे अस्तित्व सृष्टीतील प्रत्येक मनुष्याच्या अंतरात असतात. त्यात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर व अहंकार आदींचा समावेश होतो. आपल्यातील या सात राक्षसांवर विजय मिळविता येत नाही तोपर्यंत भगवतीचे चैतन्य दर्शन आपणास होणार नाही.

देवीभागवत ग्रंथामध्ये शाकंभरी देवीच्या उत्पत्तीबद्दल दिलेल्या माहितीनुसार,एकदा खूप मोठा दुष्काळ पडला. लोक अन्नपाण्याविना उपाशी राहिले. त्यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला. देवीला या करुणा आली. तिने आपल्या अंगातून असंख्य शाक भाज्या उत्पन्न केल्या. त्या भूकेलेल्यांना खाऊ घातल्या. प्रजेच्या रक्षणासाठी धान्य निर्माण करणार्‍या श्री शाकंभरीदेवीच्या प्रीत्यर्थ पौष मासातील पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. एका धार्मिक कथेनुसार हरिद्वार- केदार रस्त्यावर कुमाऊॅं टेकडीवर देवीने एक हजार वर्षे केवळ शाकभाज्या खाऊन तपश्चर्या केली. त्यामुळे ही देवी ‘शाकंभरी देवी’ या नावाची प्रसिद्धी मिळाली. महाभारताच्या वनपर्वात आणि पद्मपुराणात त्याबाबतचे संदर्भ आढळतात

शाकंभरी नवरात्र राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये लोकप्रिय आहे. कर्नाटकामध्ये शाकंभरी देवीला बनशंकरी देवी म्हटलं जातं आणि नवरात्रात शाकंभरी अष्टमी खूप महत्त्वाची मानली जाते.

पौर्णिमेला देवीच्या नैवेद्यास न्यूनतम ६० आणि जास्तीतजास्त १०८ भाज्या असतात. भारतात सर्वत्र शाकंभरी पौर्णिमेचा कुलाचार केला जातो. या दिवशी श्री क्षेत्र माहूर येथे रेणुकादेवीची थाटात रथयात्रा काढतात.

 आपले सण आणि उत्सव साजरे करण्यामागे काही आरोग्यदायी संकेत देखील असतात. हिवाळयात मुबलक भाज्या येतात. सणाच्या निमित्ताने या भाज्यांचा आस्वाद घेता यावा याकरिता हा छुपा उद्देश आहे.

🙏🙏🙏🙏🙏🙏

संबंधित पोस्ट

महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली असा मंत्र आहे. ॐ मृत्युंजय महादेव त्राहिमां शरणागतम जन्म मृत्यु जरा व्याधि पीड़ितं कर्म बंधनः

झोन स्तरीय निरंकारी बाल समागम चे जालना येथे आयोजन.

योगेश नगर येथे श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह; भक्तीमय वातावरणात ह.भ.प. भागवत महाराज काळबांडे यांचे कथा प्रवचन

vishwatmaklokswamivarta

कुंभमेळा का होतो!?🕉️🚩*

vishwatmaklokswamivarta

50 दिवसांत दंडक्रम पारायण पूर्णः काशी नगरीत 200 वर्षांनी महाराष्ट्राने पुन्हा घडवला इतिहास; पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र  वार्षिक निरंकारी संत समागमाच्या स्वेच्छा सेवांचा भव्य शुभारंभ यावर्षी ऐतिहासिक निरंकारी संत समागम सांगली नगरीत मुंबईसह महाराष्ट्रातून हजारो सेवादल व भक्तगण सेवेसाठी उपस्थित

vishwatmaklokswamivarta