
विठ्ठलाची वारी..आषाढी वारीच्या वारकऱ्यांचा केला असा अपमान..? यांच्यावर केलेल्या कारवाईचा
विरोधी पक्षनेते,देवेंद्र फडणवीसांकडून निषेध
प्रतिनिधी करोना च्या प्रादुर्भावामुळे हळूहळू वारी संपुष्टात येत असल्यामुळे वारकऱ्यांनी, प्रत्येक वर्षी निघत असणारी आषाढी वारी नेहमीच निघत होते परंतु करुणा च्या या विळख्यातून वारी ही वाचली नाही यामुळे सालाबादाप्रमाणे नेहमीच निघत असणारी आषाढी वारी निमित्ताने पायी,आषाढी वारी च्या वारकऱ्यांचा असा अपमान..?; बंडातात्या यांच्यावर केलेल्या कारवाईचा भाजपा चे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांकडून निषेध केला आहे
पायी वारीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी पोलिसांनी आज पहाटे त्यांना ताब्यात घेत वडमुखवाडी चरहोली येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पायी वारी साठी परवानगी द्यावी, अशी मागणी बंडातात्या यांनी केली होती. मात्र करुणा महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पायी वारीला परवानगी नाकारली. मात्र पायी वारी करणारच, अशी ठाम भूमिका घेत शनिवारी पहाटे काही वारकऱ्यांनी पायी वारी सुरू केली. त्यावेळी पोलिसांनी त्या वारकऱ्यांसह बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतले. पायी वारी करू नये असे समजावून सांगण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला.
बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आणि विठ्ठल-वारकरी यांचे नाते अवर्णनीय असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधले? काहीच मध्यम मार्ग नव्हता? वारकर्यांचा असा अपमान?, असे सवाल उपस्थित करत देवेंद्र फडणवीसांनी या कारवाईचा ट्विटरद्वारे निषेध केला आहे.



